जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावरशिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(political), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , अजित पवार आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार उपस्थित होते. मात्र, हेलिकॉप्टर उतरत असताना, हेलिपॅडभोवती लावलेल्या बॅरिकेडमुळे पायलटना अडचणींचा सामना करावा लागला, त्यामुळे हेलिकॉप्टर काही काळ हवेतच घिरट्या घालत राहिले.

शिवनेरीवर होणाऱ्या गर्दीचे नियोजन(political) आणि सुरक्षेच्या कारणास्तव हेलिपॅडभोवती बॅरिकेड लावण्यात आले होते. हेलिकॉप्टर उतरत असताना, पायलटना हेलिपॅड दिसले, परंतु त्याचवेळी भोवती असलेले बॅरिकेडदेखील दिसले. या अडथळ्याचा धोका ओळखून पायलटने हेलिकॉप्टरचा वेग कमी केला.
त्याने हेलिकॉप्टर काही काळ हवेत स्थिर करून, त्याची दिशा अलगद पूर्वेकडून पश्चिमेकडे केली. बॅरिकेडबाबत पायलटने मुख्यमंत्री आणि इतरांना तातडीने कळवले.
या घटनेची माहिती मिळताच, मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंकज देशमुख यांना याबाबत काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. या घटनेची चर्चा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये सुरू होती.
पुढील वर्षी याबाबत सुरक्षा नियम आणखी कडक होऊन, प्रशासनाकडून खबरदारीचे नियोजन केले जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. देवेंद्र फडणवीस मागील सात वर्षांत पाच वेळा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले आहेत.
हेही वाचा :
मोठी बातमी! लाडक्या बहिणींना धक्का…
भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्याचे Live Streaming कधी आणि कुठे पाहता येणार?
मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या