सांगलीत भरधाव पिकपच्या धडकेत दोन वर्षीय चिमुकल्याचा जागीच अंत

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातून एक मन सुन्न करणारी घटना(pickup) समोर आली आहे. मिरजहून शिरोळाकडे जाणाऱ्या वाहनाला भरधाव पिकपने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात अवघ्या दोन वर्षीय चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी पिकअप चालकास ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विकास माळी (वय २) असं मृत चिमुकल्याचं (pickup)नाव आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने पिकअप टेम्पोची जोरदार तोडफोड केली. मिळालेल्या माहितीनुसार मृत चिमुकला हा लक्ष्मी मंदिर(temple) घाट परिसरात आपल्या कुटुंबियासोबत राहतो. शनिवारी दुपारच्या सुमारास विकास हा आपल्या घराबाहेर खेळत होता.

त्यावेळी शिरोळकडे जाणाऱ्या एक भरधाव वेगात पिकअप आला. क्षणार्धात या पिकअपने विकासला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की विकास फुटबॉलसारखा हवेत उडाला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू(death) झाला. अपघातानंतर पिकअप चालक घटनास्थळावरून पसार झाला.

यानंतर नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत पिकअप वाहनाची तोडफोड केली. अपघाताची (Accident )माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विकासचा मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी पिकअपचालक फिरोज मोमीन याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा :

भारतीय संघ आज बांगलादेशविरोधात मैदानात उतरला आहे.

सांगलीतील पराभवावरुन भाजपचे चिंतन; कार्यकर्त्यांनी आवळला नाराजीचा सूर

लेट येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांनाचे थेट पगार कापणार सरकारचा निर्णय..