हातकणंगलेत डंपर दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू

भरधाव डंपर(dumpster truck) आणि मोटारसायकल यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात पूजा सुरेश पाटील (वय 32, रा. तारदाळ, ता. हातकणंगले) या महिलेचा मृत्यू झाला. या अपघातात अन्य तिघेजण जखमी झाले आहेत. अपघाताची नोंद हातकणंगले पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिसांनी डंपर चालक विकास पारसे (रा. इचलकरंजी) याला डंपरसह ताब्यात घेतले आहे.तारदाळ येथील सुरेश पाटील मोटारसायकलवरून कुलदैवत धुळोबा देवालय येथे निघाले होते.

हातकणंगले येथील इचलकरंजी फाट्यानजीकच्या ओढ्याजवळ मागून आलेल्या भरधाव डंपरने(dumpster truck) त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. या धडकेत पाटील दाम्पत्य, मुलगा आर्यन आणि भाचा विराज रस्त्यावर आपटले.

पूजा यांच्या डोक्याला मार लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. घटनास्थळी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे यांनी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी कोल्हापूर येथे वाहनातून नेत असतानाच वाटेतच रुग्णवाहिका आली. त्यामुळे तातडीने रुग्णवाहिकेतून जखमींना कोल्हापूर येथील सीपीआरमध्ये दाखल केले.

परंतु उपचारापूर्वीच पूजा यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे पाटील कुटुंबीयांना धक्का बसला. त्यांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. घटनास्थळी मोठी गर्दी झाली. दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक कोंडी झाली होती.

हेही वाचा :

इचलकरंजीत तरुणाचा पाठलाग करून खून….

आमदाराने मतदाराच्या कानशिलात लगावली, मतदारानेही थप्पड मारली Video

‘महिलांना वर्षाला १ लाख रुपये देणार..’, सोनिया गांधींची सर्वात मोठी घोषणा; काय आहे महालक्ष्मी योजना?