विवाहबाह्य संबध ठेवल्याचा आरोप लावत महिलेला जमावाची काठीने मारहाण 

मेघालयमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्याठिकाणी एका महिलेसोबत(extra marital dating) अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. जमावात उपस्थित लोक महिलेला विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करत तिला बेदम मारहाण करत आहेत असा एक व्हिडीओ सोशल मिडीयावप व्हायरल होतो आहे. महिलेला काठ्यांनी मारहाण केली जात आहे. त्याच वेळी, महिला आणि पुरुष गट तिथे उभा राहुन पाहताना दिसतात. याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

ही खळबळजनक घटना मेघालयातील (extra marital dating)वेस्ट गारो हिल्स येथील दादेंग्रे येथील आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये गर्दीत महिलेला सार्वजनिक ठिकाणी काठीने मारहाण केली जात आहे. व्हिडिओमध्ये अनेक स्त्री-पुरुष ती घटना पाहताना दिसत आहेत. पोलिसांनी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पकडण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे म्हणणे आहे की, या महिलेचे लग्न झाले आहे. तरी देखील तिचे एका पुरूषांशी विवाहबाह्य सबंध आहेत. विवाहबाह्य संबंध ठेवल्यानंतर महिलेला मारहाण करण्यात आली आहे.

दुसरीकडे, मेघालय विधानसभा महिला सक्षमीकरण समितीच्या अध्यक्षा, सुतांगा सायपुंगच्या आमदार सांता मेरी शिला यांनी या घटनेची दखल घेतली आहे. याप्रकरणी त्यांनी पोलिसांकडून अहवाल मागवला आहे. त्या म्हणाल्या की, मेघालयातील सर्व 12 जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षकांना महिलांवरील कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याबाबत सतर्क राहण्यास सांगेल.

पोलिसांनी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोपीचा दावा आहे.

हेही वाचा :

कोल्हापूर जिल्ह्यात डेंग्यूचा कहर; ३०० हून अधिक ग्रामस्थांना लागण

आता मात्र “हद्द”च झाली! पुनश्च हरी ओम…..?

धक्कादायक… भाजप नेत्याच्या पत्नीवर हिप्नोटिज्मचा प्रयोग? लाखोंची लूट