दारूसाठी मागितले पैसे, नकार दिल्याने युवकाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

राज्यात दिवसेंदिवस गुन्ह्याच्या (crime) घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीवरुन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. ब्रेकअप झालं म्हणून भरदिवसा तरुणीची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच वर्ध्यातही घटना घडलीय. हत्याचा थरार हा मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा दृश्य अंगावर शहारे आणणारे आहेत.

दारुसाठी पैसे दिले नाहीत म्हणून एका मद्यपीने दारुच्या नशेत युवकाची दगडाने ठेचून हत्या (crime) केली. मृत झालेल्या व्यक्तीचं नाव विनोद डोमाजी भरणे असून तो देवळी तालुक्याच्या सोनेगाव आबाजी येथील रहिवाशी होता. तर आरोपीचं नाव कैलाश मोहिते असं आरोपीचं नाव आहे. आरोपी हा देवळीच्या तहसील कार्यालयासमोरील झोपडपट्टीचा रहिवासी आहे, पोलिसांनी त्याला ताब्यात घटनास्थळावरुन ताब्यात घेतलं आहे. विनोदची हत्या करताना आरोपी कैलास हा दारुच्या नशेत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, विनोद आबाजी भरणे हा देवळी येथून आपलं काम आटपून गावाला जात होता. पोलीस वसाहतीसमोर तो ऑटोची वाट पाहत उभा होता. त्यावेळी मद्यपी आरोपीने विनोदकडे पैसे मागितले. विनोद आणि आरोपी एकमेकांना ओळखत नव्हते. तरीही आरोपी त्याच्याकडे पैसे मागत होता. विनोदने त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्याचा राग आल्याने आरोपीने विनोदवर दगडाने हल्ला केला. रस्त्यावर निपचीत पडलेल्या विनोदवर आरोपीने दगडाने हल्ला करत होता. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. या हत्येचा थरार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

हेही वाचा :

अंगारकी संकष्टी चतुर्थीला चुकवू नका हा’ एक तासाचा शुभ मुहूर्त, जाणून घ्या..

25 जूनपासून जोरदार बरसणार, राज्यात यावर्षी जास्त पावसाचा अंदाज आहे

आरोग्यमंत्र्यांसमोरच भाजप पदाधिकाऱ्याचा पारा चढला