अब्दू रोजिकचा झाला साखरपुडा, पत्नीसोबतचा खास फोटो, ‘या’ दिवशी होणार लग्न

‘बिग बॉस’ 16 चा स्टार अब्दू रोजिकचा नुकताच साखरपुडा(engagement rings) पार पाडला आहे. अब्दू रोजिकने आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत फोटो शेअर केला आहे. अमीरा नावाच्या एमिराटी मुलीशी लग्न करणार आहे. त्याने आपल्या सोशल मीडिया हँडलवर एका व्हिडिओद्वारे आपल्या लग्नाची गोड बातमी शेअर केली आहे.

अब्दू रोजिकने फोटो (engagement rings)शेअर केल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान, अब्दूने या वर्षी 24 एप्रिल रोजी झालेल्या अमीरासोबतच्या त्याच्या साखरपुड्याच्या समारंभातील फोटो शेअर केले. काही दिवसांपूर्वी 10 मे रोजी अब्दू रोजिकने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अमीरासोबतच्या एक व्हिडीओ शेअर केला आहे.

जुलैमध्ये हे जोडपं लग्नबंधनात अडकणार आहे. फोटोंमध्ये, अब्दू त्याच्या भावी वधूला हृदयाच्या आकाराची हिऱ्याची अंगठी दाखवताना दिसला. तर दुसऱ्या फोटोत त्याची होणारी भावी पत्नीची झलक दिसत होती. फोटो शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये 24 एप्रिल अशी त्याच्या एंगेजमेंटची तारीख नमूद केली आहे.

अब्दू रोजिकने 8 मे रोजी त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर लग्नाची घोषणा करून त्याच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले. एका व्हिडिओद्वारे त्याने आपल्या लग्नाची बातमी शेअर केली. काळ्या रंगाचा टू-पीस सूट परिधान करून तिने हृदयाच्या आकाराची हिऱ्याची अंगठीही दाखवली. अब्दूने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी माझ्या आयुष्यात कधीच विचार केला नव्हता की, मी इतका भाग्यवान आहे की, मला असा प्रेम मिळेल किंवा असा आदर मिळेल, असं कधी वाटलंच नव्हतं. 7 जुलैची तारीख लग्नासाठी ठरवली आहे.

अब्दु रोजिक 7 जुलै रोजी यूएईमध्ये अमीरासोबत लग्नगाठ बांधणार आहे. दोघांची भेट झाली, नजरेमध्येच खाणाखूणा झाल्या आणि दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. खलीज टाईम्सच्या वृत्तानुसार, अब्दूने 19 वर्षीय अमीरासोबत लग्न केले आहे, जी शारजाहची अमिराती मुलगी आहे. रिपोर्टनुसार, अब्दूची अमीरासोबत या वर्षी फेब्रुवारीमध्ये दुबई मॉलमधील सिप्रियानी डोल्सी येथे भेट झाली.

हेही वाचा :

आजचे राशी भविष्य (11-05-2024)

मोदी 21 व्या शतकातील राजे; ते कुणाचेच ऐकत नाहीत

‘मोदी तुम्ही तुमचा आत्मा सैतानाला विकला का?’; उद्धव ठाकरे कडाडले