गेल्या वर्षी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय खूप चर्चेत होते. या दोघांचा लवकरच घटस्फोट(divorce) होणार असल्याच्या अनेक चर्चा होत होत्या. मात्र, सर्व दावे करूनही दोघांनी यावर मौन पाळले. आणि आता याचदरम्यान अलीकडेच ते दोघेही त्यांची मुलगी आराध्याच्या शाळेच्या वार्षिक समारंभात एकत्र दिसले होते, त्यानंतर त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्या केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता याचदरम्यान या कपलचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये हे दोघेही त्यांची मुलगी आराध्यासोबत दिसत आहेत.
आता पुन्हा एकदा अभिषेक-ऐश्वर्या एकत्र दिसले आहेत(divorce). नुकतेच आराध्यासोबत नवीन वर्ष साजरे करून दोघेही मुंबईत परतले आहे. आता कुटुंबाला एकत्र पाहिल्यानंतर चाहत्यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. या जोडप्याला एकत्र पाहून चाहते खूप खूश आहेत. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
एका चाहत्याने सांगितले की, “ते एकत्र छान दिसतात.” आणखी एका चाहत्याने लिहिले, “शेवटी, ते एकत्र आहेत याचा मला आनंद आहे. लोकांनी हे समजून घेतले पाहिजे की प्रत्येक लग्न पब्लिसिटी स्टंटसाठी नसते.
काही लोक त्यांच्या गोपनीयतेला जास्त महत्त्व देतात.” “त्यांना एक कुटुंब म्हणून पाहून खूप आनंद झाला,” दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले. “यामुळे अफवा पूर्णपणे थांबतील,” असे लिहून चाहत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांना एकत्र पाहून चाहत्यांना देखील आनंद झाला आहे.
ऐश्वर्या, आराध्या आणि अभिषेकचा हा व्हिडिओ चाहत्यांमध्ये खूप चर्चेत आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्री पापाराझींना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. त्याचवेळी अभिषेकने त्याला शुभेच्छा दिल्या आणि अभिनंदन केले. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अभिषेक बच्चन लवकरच ‘किंग’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेत्यासोबत शाहरुख खान आणि सुहाना खान देखील दिसणार आहे. हा चित्रपट लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :
न्याय मिळाला नाहीतर… धनंजय मुंडेंला रस्त्याने फिरू देणार नाही; मनोज जरांगेंची गर्जना
छतावर स्टंट करणं तरुणाला पडलं महागात, जमिनीवर कोसळला अन्… Video Viral
हिवाळ्यात शरीराला सूर्यप्रकाश न मिळाल्यास मानसिक आरोग्य ढासळण्याची भीती