‘आदित्य ठाकरेंचा हट्ट अन् मला मुख्यमंत्रीपद मिळालं’; फडणवीसांचा गौप्यस्फोट!

महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्रीपद हा नेहमी औत्सुक्याचा विषय(political articles) ठरला आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि देवेंद्र फडणवीस यांचा अपवाद वगळता कोणत्याही मुख्यमंत्र्यांना सलग पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत आले नाही. कोणत्या कोणत्या कारणाने मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावे लागले किंवा त्यांच्यापुढे कसलेतरी संकट येऊन उभे राहिले. मात्र 2014 मध्ये आपल्याला शिवसेनेने धरलेल्या हट्टामुळे मला मुख्यमंत्रीपद मिळाले असा गौप्यस्फोट फडणवीसांनी केला आहे.

मुलाखतीत फडणवीस(political articles) म्हणाले, महाराष्ट्राला युती आणि आघाडीच्या राजकारणाशिवाय पर्याय नाही. मात्र 2014 मध्ये विधानसभेच्या केवळ चार जागांसाठी शिवसेनेने भाजपबरोबर असलेली युती तोडली. शिवसेनेला आम्ही 147 मध्ये जागा देऊन आम्ही 127 जागांवर लढण्यास तयार होतो, पण आदित्य ठाकरे यांनी 151 जागांचा हट्ट धरला. यामुळे शिवसेनेन युती तोडली.

फडणवीस पुढे म्हणाले, शिवसेनेने युती तोडल्यामुळे आम्हाला आमची ताकद समजली. याचा मला वैयक्तित पातळीवर फायदा झाला व मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो. जास्त जागा लढवू शकलो, यामुळे आमचे जागा वाढून आमचे अधिक उमेदवार निवडून आले.

जर आम्ही युतीत शिवसेनेबरोबर लढलो असतो तर आमचे उमेदवारांची कमी संख्येत निवडून आले असते अन् शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता. आदित्य यांनी 151 जागांचा आग्रह धरला होता त्यामुळे शिवसेनेच्या हट्टापायीच मला मुख्यमंत्रीपद मिळाले, खरं तर मी त्यांचे आभारच मानतो, असे फडणवीस म्हणाले.

हेही वाचा :

संजयकाकांच्या दिलदार मित्राने चंद्रहार पाटलांचा बळी दिला!

रोहित शर्मा आज मुंबईसाठी खेळणार शेवटचा सामना? Video Viral

आजपासून 10 दिवस सिनेमागृह बंद, काय आहे कारण?