सांगली बंदचा दिला इशारा; ‘शिवप्रतिष्ठान’ची प्रशासनास दाेन दिवसांची मुदत

सांगलीसह जिल्ह्यातील कॅफे शॉपमध्ये हाेणारे गैरप्रकार(administration) थांबविण्यासाठी येत्या दोन दिवसांत अयाेग्य कॅफे शाॅपवर कारवाई करा अन्यथा पुन्हा रस्त्यावर उतरू आणि प्रसंगी सांगली बंद करू असा इशारा शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष नितीन चौगुले यांनी आज (शुक्रवार) प्रशासनास दिला. त्याबाबतचे निवेदन शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने सांगली पोलिसांनी दिले आहे.

सांगली शहरातील कॅफे(administration) शॉपमध्ये अश्लील चाळे सुरू असल्याचा आरोप करत आज शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांकडून तीन कॅफे शॉपची ताेडफाेड केली. यानंतर शिवप्रतिष्ठान युवाचे अध्यक्ष नितीन चौगुले यांनी चुकीच्या गाेष्टी कॅफे शाॅपमध्ये चालणार असतील तर प्रसंगी रस्त्यावर उतरु असा इशारा दिला.

चौगुले म्हणाले सांगली शहरातील एका मुलीला कॅफे शॉप मध्ये गुंगीच औषध देऊन तिच्यावर अत्याचाराचा प्रकार घडला. त्यामुळे संतप्त भावनेतून शहरातील 3 कॅफे शॉपची तोडफोड कार्यकर्त्यांनी केली. यापुढील काळात कॅफे शाॅपवर कारवाई होणार नसेल तर कॅफे शॉप विरोधातील आंदोलन राज्यभर उभे करू असा इशारा देखील शिवप्रतिष्ठान युवाच्या वतीने नितीन चौगुले यांनी दिला.

दरम्यान शहरातील तीन कॅफे शॉपच्या तोडफोड प्रकरणी पोलिसांनी 16 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चाैकशी सुरु आहे अशी माहिती वरिष्ठ पाेलिस अधिकारी रितू खोकर यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

हेही वाचा :

ठाकरे गटाच्या महिला नेत्या यांना मारहाण…

भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी!

सांगलीतील ३ कॅफे एकापाठोपाठ एक फोडले; शिवप्रतिष्ठान संघटना आक्रमक