धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर ‘या’ नेत्याकडे असणार आता मंत्रिपदाचा भार

मुंबई : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे(political leader) नेते धनंजय मुंडे यांनी नुकताच मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनाम्यात त्यांनी आजारपणाचे कारण दिले आहे. या राजीनाम्यानंतर त्यांच्याकडे असणारे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय कोणाकडे जाणार याची चर्चा सुरु होती. त्यानुसार, काही नावेही समोर आली होती. असे असताना आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचा कार्यभार स्वत:कडे ठेवला आहे.

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख(political leader) यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणातील अंगावर काटा आणणारे फोटो सोमवारी व्हायरल झाले होते. हे फोटो पाहून राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. या हत्येप्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती. संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे मारेकऱ्यांचे फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला होता. अखेर त्यांनी राजीनामा दिला होता.

दरम्यान, मंगळवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणत्या मंत्र्याला मंत्रि‍पदाची लॉटरी लागणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. या प्रश्नाचे उत्तर अखेर समोर आले आहे. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचा कारभार स्वत:कडे ठेवला आहे.

अजित पवार यांच्याकडे सध्या अर्थ आणि उत्पादन शुल्क खात्याचा कारभार आहे. यामध्ये आता अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या निमित्ताने तिसऱ्या खात्याची भर पडली आहे. मात्र, अजित पवार हा अतिरिक्त कार्यभार कधीपर्यंत सांभाळणार आणि हे खाते राष्ट्रवादीतील कोणत्या मंत्र्याच्या पदरात टाकणार, याविषयी माहिती समोर आलेली नाही.

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर हा विभाग रिक्त होता. मात्र, अर्थसंकल्पीय अधिवेशनात या खात्याशी संबंधित प्रश्न सभागृहात विचारले जाऊ शकतात. त्यामुळे अजित पवार यांनी तूर्तास या खात्याचा कार्यभार स्वत:कडे घेतल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा :

 विराट कोहलीमुळे गौतम गंभीर निराश ? चर्चांना उधाण, कोच म्हणाले…

स्वारगेट बलात्कार प्रकरण, दत्तात्रय गाडेबद्दल चौकशीतून हादरवणारी माहिती समोर

अखेर आझमी यांचे निलंबन मुक्ताफळे उधळली होती…!

स्वारगेट बलात्कार प्रकरण, दत्तात्रय गाडेबद्दल चौकशीतून हादरवणारी माहिती समोर