विश्वचषक सामना संपल्यानंतर आनंद व्यक्त करताना दोन गटात गोळीबार अन् कोयत्याने राडा

दोन दिवसापूर्वी नाशिकरोड येथील मुक्तीधाम मागे (t20 world cup)असलेल्या हॉटेल मथुराचे नितीन सचदेव यांच्यावर कोयता आणि रॉडने मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच विश्वचषक सामना संपल्यानंतर नाशिकरोड परिसरात आनंद व्यक्त करताना दोन गटात तुफान राडा झाल्याची धक्कादायक घडली आहे. या राड्यात गोळीबार आणि कोयत्यांचा सर्रास वापर करण्यात आला असून यात पाच जण जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, काल भारताने रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टी 20 वर्ल्ड कपचे(t20 world cup) विजेतेपद मिळवलं. दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत भारताने ऐतिहासिक विजय मिळवला. त्यामुळे संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. नाशिकरोड येथील विहितगाव परिसरातील मथुरा चौक येथे विश्वचषक सामना संपल्यानंतर आनंद व्यक्त करताना देवळाली गाव आणि विहितगाव येथील गटात तुफान राडा झाला. यात गोळीबार आणि कोयत्यांचा वापर करण्यात आला.

यात एक गटाकडून युवकावर गोळीबार केल्याने एकाच्या मांडीला गोळी लागली. तर राड्यात झालेल्या मारहाणीत चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नाशिकरोड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. देवळाली गाव येथे राहणाऱ्या आकाश सोमनाथ पवार यांच्या मांडीला गोळी लागली आहे. जुन्या कुरापतीवरून झालेल्या मारहाणीत चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

गोळीबाराची माहिती मिळताच उपनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गोळीबार आणि हल्ल्या प्रकरणी दोन आरोपींना उपनगर पोलिसांनी अटक केली आहे. हल्ला कशामुळे झाला आणि गोळीबारात वापरण्यात आलेली बंदूक कुठून आली याचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

हेही वाचा :

शनीच्या वक्री चालीने ‘या’ 4 राशींना मिळणार अपार धन

वर्ल्डकप विजयानंतर विराट कोहलीने पत्नी अन् मुलांना केला व्हिडिओ कॉल

शरद पवार अजितदादांच्या आणखी एका बालेकिल्ल्याला सुरुंग लावणार…