मागील काही वर्षांपासून भारतीय क्रिकेट (cricketer)आणि बॉलीवूड कलाकारांच्या अनेक घटस्फोटाच्या बातम्या समोर आल्या आहेत. यामध्ये अनेक मोठे कलाकार घटस्फोटाचे बळी ठरले आहेत. यामध्ये हार्दिक पांड्या, कुशा कपिल, समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य अशा अनेक मोठा कलाकारांचा घटस्फोट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. क्रिकेट विश्वातील शिखर धवन, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, मोहम्मद शामी अशा अनेक नावांचा समावेश आहे.
भारतीय संघाचा स्टार लेग स्पिनर(cricketer) युजवेंद्र चहल आणि धनश्री यांच्या घटस्फोटाच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे, अजुनपर्यत या दोघांनी अधिकृत कोणतीही माहिती दिलेली नाही परंतु दोघांनीही सोशल मीडियावरील फोटो काढून टाकले आहेत एवढेच नवे तर एकमेकांना अनफॉलो देखील केले आहे. त्याच दरम्यान आणखी एका भारतीय क्रिकेटरच्या घटस्फोटाच्या बातमीने जोर पकडला आहे. मनीष पांडे असे या भारतीय क्रिकेटपटूचे नाव आहे. मनीष आणि त्याची पत्नी अर्शिता शेट्टी यांच्यात घटस्फोट झाल्याच्या बातम्या येत आहेत आणि या बातम्याही चहल आणि धनश्रीच्या तशाच चर्चेत आल्या आहेत.
मनीष आणि अर्शिता यांनीही एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले असून, त्यानंतर घटस्फोटाची अटकळ बांधली जात आहे. भारतीय संघातून खेळलेला मनीष बराच काळ टीम इंडियातून बाहेर आहे. त्याने २ डिसेंबर २०१९ रोजी मॉडेल-अभिनेत्री अर्शितासोबत लग्न केले. गेल्या वर्षी जूनपासून अर्शिताच्या सोशल मीडियावर मनीषचे कोणतेही फोटो नाहीत. त्याचप्रमाणे मनीषने अर्शिताचे फोटोही सोशल मीडियावरून डिलीट केले आहेत. दोघेही काही दिवसांपासून एकत्र दिसत नाहीत.
मनीष हा विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली अंडर-१९ विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा भाग होता. यानंतर दोघेही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये एकत्र खेळले. आयपीएलमध्ये शतक झळकावणारा मनीष हा पहिला भारतीय फलंदाज आहे. मात्र, त्याची कारकीर्द फार पुढे जाऊ शकली नाही.
टीम इंडियामध्ये मिळालेल्या संधींचा फायदा तो उठवू शकला नाही. त्याने भारतासाठी २९ एकदिवसीय आणि ३९ टी-२० सामने खेळले आहेत. आयपीएलमध्येही तो अनेक संघांसोबत खेळला. यावर्षी तो कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना दिसणार आहे. मनीषची क्रिकेट कारकीर्द सध्या फारशी चांगली नाहीये. यंदाच्या विजय हजारे करंडक स्पर्धेतही त्याला कर्नाटक संघातून वगळण्यात आले होते.
People were shocked by the news of leg spinner Yuzvendra Chahal and Dhanashree's divorce.
— vivek Frankmilan (@vivekpall) January 10, 2025
But meanwhile, the news of divorce between cricketer Manish Pandey and his wife Arshita has heated up the entire market atmosphere.
According to sources, Manish Pandey and his wife have… pic.twitter.com/OrhJtXYqz1
मनीष आणि अर्शिता यांनी त्यांच्या घटस्फोटावर अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही. सोशल मीडिया ॲक्टिव्हिटीजच्या आधारे दोघे वेगळे झाल्याची अटकळ बांधली जात आहे. घटस्फोटाचे कारण काय, याबाबतही परिस्थिती स्पष्ट नाही. यावेळी मनीष आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेल जेणेकरून तो आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करू शकेल आणि पुन्हा एकदा त्याचे क्रिकेट करिअर पुढे नेऊ शकेल.
हेही वाचा :
करोडपती व्हायचंय? मग, वाट का पाहता फक्त ‘हा’ सोपा फॉर्मुला फॉलो कराच!
इचलकरंजी: राज्यपाल नियुक्त आमदारांच्या लॉटरीत सुरेश हाळवणकरांचे नाव आघाडीवर?
…तर नवी कार खरेदी करणं अशक्यच; सरकारच्या नव्या धोरणामुळे होऊ शकतो अनेकांचा स्वप्नभंग