व्हायरसचा कहर, शेतकरी चिंतातूर! माणसानंतर आता जनावरांना क्वारंटाईन करण्याची वेळ?

Farmers

महाराष्ट्रातील शेतकरी (Farmers ) चिंतातुर आहे. यांचं कारण आहे बळीराजाची भिस्त ज्या जनावरांवर असते त्या जनावरांवर त्यांच्यावर आलेलं संकट. अजूनही माणसावरील कोरोनाचं संकट पूर्णपणे टळलं आहे असं म्हणता येणार नाही. अशात बळीराजाच्या जनावरांवर जीवघेणं संकट ओढवलं आहे.

जनावरांमध्ये वेगानं पसरणाऱ्या लम्पी आजारानं बळीराजाची चिंता वाढवलीये. लम्पी आजाराचा दुभत्या जनावरांना जास्त धोका आहे. (Farmers ) या आजारामुळे दुभत्या जनावरांच्या दूध उत्पादनात 10 ते 15 टक्के घट होते. तसंच जनावरांमध्ये गर्भपात आणि वंध्यत्वाचा धोका निर्माण होऊ शकतो अशी माहिती पशुवैद्यक अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची विशेष काळजी घ्यावी असं आवाहन देखील करण्यात आलंय.

जाणून घेऊयात लम्पी आजाराची लक्षणं

  • जनावरांच्या डोळ्यांतून, नाकातून पाणी
  • लसिकाग्रंथींना सूज येणं, ताप येणं
  • दुधाचं प्रमाण कमी होणं
  • तोंडात व्रण आल्याने चारा खाणे, पाणी पिणे कमी होणं
  • त्वचेवर मोठ्या गाठी येणं
  • पायावर सूज आल्यानं जनावरं लंगडतात

या कठीण परिस्थितीत बळीराजाने जनावरांची कशी काळजी घ्यावी हे देखील पशुवैद्यक अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे..

 

जनावरांची काळजी कशी घ्याल?

  • निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळं बांधा
  • गायी आणि म्हशींना एकत्रित ठेवू नका
  • बाधित गावांमध्ये चारा-पाण्याची स्वतंत्र सोय करा
  • निर्जंतुक द्रावणाची परिसरात फवारणी करा

जनावरांना होणार लंपी आजार 17 जिल्ह्यांमध्य पसरला आहे. पशु आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात जनावरांच्या वाहतुकीवर निर्बंध घातले गेले आहेत. जनावरांचे आठवडी बाजार देखील पुढील आदेश मिळेपर्यंत राज्यात बंद राहतील.  परवानाधारक कत्तलखान्यांनी विना तपासणी जनावरांची वाहतूक केली तर फौजदारी गुन्हे दाखल होतील.

 

Smart News:-