Airtel चा जबरदस्त रिचार्ज, 28 दिवसांच्या प्लॅनवर फ्री मिळणार 3 महिने Disney+ Hotstar

एअरटेलने आपल्या काही प्रीपेड प्लॅनच्या(disney) किमती 600 रुपयांपर्यंत वाढवल्या आहेत. या किंमत वाढनंतरही Airtel चे काही असे प्लॅन आहे, जे फायदेशीर ठरू शकतात. Airtel कडे असाच एक प्रीपेड प्लॅन आहे, ज्यामध्ये तुम्हा 28 दिवसांची वैधतासह Disney + Hotstar 3 महिन्यांसाठी मोफत मिळणार. यासोबतच या प्लॅनमध्ये दररोज 3 जीबी डेटा मिळेल. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ…

आम्ही एअरटेलच्या 549 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनबद्दल(disney) बोलत आहोत. हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग (लोकल+STD+रोमिंग) सोबत दररोज 3GB डेटा मिळतो.

म्हणजेच एकूण 84GB डेटा 28 दिवसांत उपलब्ध होईल. दैनंदिन डेटा लिमिट संपल्यानंतरही ग्राहक 64Kbps च्या गतीने इंटरनेट वापरू शकतात. या प्लॅनमध्ये तुम्हाला OTT चा फायदा देखील मिळणार आहे. यासोबतच दररोज 100 एसएमएस देखील ग्राहकांना मिळणार.

एअरटेलच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये ज्याची वैधता 28 दिवस आहे, यात ग्राहकांना 3 महिन्यांसाठी Disney + Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. इतकंच नाही तर या प्लॅनमध्ये Airtel Xstream चे सबस्क्रिप्शन देखील समाविष्ट आहे.

या प्लॅनचे ग्राहकांना अनलिमिटेड 5G डेटाही ग्राहकांना मिळेल. एअरटेलचे 5G नेटवर्क तुमच्या परिसरात लाइव्ह असेल आणि तुमच्याकडे 5G फोन असेल, तर तुम्ही डेटा संपण्याची चिंता न करता तुम्हाला हवा तेवढा 5G डेटा वापरू शकता, तोही पूर्णपणे मोफत.

हेही वाचा :

T20 WC विजयानंतर आता कुलदीप यादवची लगीन घाई?

मोठी बातमी! मुसळधार पावसामुळे पोलीस भरती प्रक्रिया स्थगित

झटपट नाश्त्यासाठी ‘मसाला मखाना’, ही आहे सोपी रेसिपी