अजित पवार नॉट रिचेबल! उपमुख्यमंत्री आहेत कुठे? कोणालाच ठाऊक नाही

बारामती मतदारसंघातील मतदान 13 मे रोजी पार पडल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री(deputy) अजित पवार कुठे आहेत यासंदर्भात समर्थकांना प्रश्न पडला आहे. बारामतीमधील मतदानाआधी अगदी दररोज प्रसारमाध्यमांबरोबर संवाद साधणारे आणि प्रचारसभांना हजेरी लावणारा अजित पवार अचानक नॉट रिचेलब झाले आहेत. त्यामुळेच समर्थकांबरोबरच विरोधकांकडूनही अजित पवारांच्या ठावठिकाण्याबद्दल प्रश्न विचारले जात आहेत.

बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र(deputy) दौऱ्यावर होते. मात्र या दौऱ्यातील कोणत्याही कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित राहिले नाहीत. आता अजित पवार कुठे आहेत यासंदर्भात वेगवेगळे दावे केले जात आहेत. त्यांचे चुलते आणि राजकीय विरोधक शरद पवार यांनीही यासंदर्भात भाष्य केलं आहे.

मोदींच्या बुधवारच्या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आवर्जून उपस्थित होते. अजित पवारही मोदींच्या सुरुवातीच्या काही दौऱ्यांदरम्यान सभांना हजर होते. मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांनी त्यांचं लक्ष बारामतीमधील प्रचारावर केंद्रित केल्याचं दिसलं. बुधवारी दिंडोरीतील सभेमध्ये अजित पवारांऐवजी छगन भुजबळ उपस्थित होते तर कल्याणमधील सभेला सुनील तटकरेंनी हजेरी लावली.

मात्र अजित पवार या सभांनाही दिसेल नाहीत किंवा घाटकोपरमधील रोड शोमध्येही सहभागी झाले नाहीत. पंतप्रधान मोदींनी मंगळवारी वाराणसीमधून उमेवदारी अर्ज भरताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. इथेही अजित पवारांऐवजी प्रफुल्ल पटेलांनीच उपस्थिती लावली.

अजित पवारांच्या प्रसारमाध्यम समन्वय करणाऱ्या टीमने अजित पवार दोन दिवसांपासून कुटुंबीयांसोबत बाहेर आहेत. नेमके कुठे आहेत माहिती नाही, असं सांगितलं आहे. तर अजित पवारांचे स्वीय सहायक असलेल्या मुसळे यांनी, “अजित पवार कुठे आहेत माहिती नाही. देवगिरी बंगल्यावर विचारा तिथे कळू शकेल,” असं म्हटलं आहे.

देवगिरी बंगल्यावरील स्वागत कक्षामध्ये अजित पवारांबद्दल विचारणा केली असता, “दादांचा दौरा आमच्याकडेही नाही. त्यामुळे कुठे आहेत माहिती नाही,” असं सांगण्यात आलं. तसेच विशेष अधिकारी असलेल्या विकास पाटील यांनी, “मी स्वतः सुट्टीवर आहे. अजित पवार कुठे आहेत माहिती नाही. कोण सांगू शकेल हेही सांगता येणार नाही,” अशी प्रतिक्रिया नोंदवली. शरद पवार यांना अजित पवारांसंदर्भात पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी, “अजित पवार खरंच आजारी आहेत,” असं उत्तर दिलं.

अजित पवारांनी बारामतीमधील कमी मतदानासाठी भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांना दोषी ठरवलं होतं. चंद्रकांत पाटलांनी बारामतीमधील सभेमध्ये ‘शरद पवार यांना आम्हाला संपवायचं आहे’ असं विधान केलं होतं. या विधानावरुन अजित पवारांनी थेट नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे पुण्यातील भाजपा कार्यकर्ते अजित पवारांवर नाराज असल्याचं सांगितलं जात आहे.

हेही वाचा :

कोल्हापूर : पायलटची डुटी संपली, कंपनीने विमानच रद्द केले; प्रवाशांचे हालच हाल

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! 41 औषधांच्या किमती होणार कमी, सर्वसामान्यांना मोठा दिलासा

मोठी अपडेट; सर्व योजनांचे पैसे लाभार्थ्यांना लवकरच UPI मार्फत