गोविंदाच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू असताना लोकप्रिय अभिनेत्याचा काडीमोड

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता (actor)गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा या दोघांचा ३७ वर्षांच्या संसारातून घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. आता अशातच आणखी एका बॉलिवूड अभिनेत्याच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलंय. मीडिया रिपोर्टनुसार, अनेक टेलिव्हिजन शो आणि अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला अभिनेता अमन वर्मा आणि वंदना लालवानी लग्नाच्या ९ वर्षांनंतर घटस्फोट घेणार असल्याची बातमी समोर येतेय. अमन आणि त्याच्या पत्नीच्या घटस्फोटामागचं कारणही समोर आलंय.

दरम्यान, अमन आणि वंदना यांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा सुरु असून अद्याप त्यांच्या घटस्फोटाच्या वृत्तावर पुष्टी झालेली नाही. ‘बागबान’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आणि प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्ये काम केलेला लोकप्रिय अभिनेता अमन वर्मा लग्नाच्या ९ वर्षांनंतर घटस्फोट घेणार अशी बातमी समोर येताच त्याच्या चाहत्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. या जोडप्याच्या जवळच्या सूत्रांनी सांगितलं की, अमन वर्मा आणि वंदना यांच्यात बऱ्याच काळापासून वाद सुरू आहेत. दोघांनीही आपआपसात मतभेद सोडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण काहीच सुधारणा झाली नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वंदनाने स्वतः घटस्फोटासाठी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. अमन वर्मा आणि वंदना यांची पहिली भेट २०१४ मध्ये ‘हमने ली है- शपथ’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान झाली होती. २०१५ मध्ये त्यांनी साखरपुडा केला होता आणि २०१६ मध्ये लग्नगाठ बांधली होती.

अमन (actor)आणि वंदना यांनी त्यांचे कुटुंब वाढवण्याचा विचार केला. जेणेकरून दोघांमधील नाते अधिक घट्ट होऊ शकेल. पण त्यांच्या नात्यातली दरी इतकी वाढली होती की त्यांनी शेवटी घटस्फोटाचा मार्ग निवडला. विशेष म्हणजे अमन किंवा त्याची पत्नी वंदना यांनी बऱ्याच काळापासून सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे कोणतेही फोटो शेअर केलेले नाहीत. ज्यामुळे त्यांच्या बातम्यांना अधिक बळ मिळत आहे.

दोघांनीही घटस्फोटाच्या बातमीवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. जेव्हा अमन वर्मा यांच्याशी संपर्क साधला तेव्हा ते म्हणाले, ‘मला काहीही भाष्य करायचं नाही. मला जे काही सांगायचं आहे ते योग्य वेळी माझ्या वकिलामार्फत कळवलं जाईल.’ वंदना लालवानीनेही याबद्दल काहीही सांगण्यास नकार दिला. ५३ वर्षीय अमन वर्मा शेवटचा ‘द यूपी फाइल्स’ चित्रपटात दिसला होता. यासोबतच त्याने ‘मिश्री’ नावाचा हा टीव्ही शो देखील केला होता.

‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ ही मालिका अमन वर्माच्या फिल्मी करियरला कलाटणी देणारी ठरली. या शोमध्ये अमनने अनुपम कपाडियाची भूमिका साकारली होती. त्या भूमिकेमुळे अभिनेता देशभरातल्या घराघरात लोकप्रिय झाला होता. यासोबतच त्यांनी ‘बागबान’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या ऑन-स्क्रीन मुलाची भूमिका साकारली होती.

हेही वाचा :

प्रचंड वेगात लाट आली अन्…! खवळलेल्या सागरात भली-मोठी बोट झाली पलटी Video Viral

सांगलीतील धक्कादायक घटना : रक्ताच्या उलट्या झाल्याने बर्फ गोळा विक्रेत्याचा मृत्यू;

माता न तू वैरिणी! आईने केली १७ वर्षीय दिव्यांग मुलीची हत्या, आजीने लावली मृतदेहाची विल्हेवाट