साडीतील अनाया बांगरचा ग्लॅमरस अंदाज, म्हणाली – पू बनली पार्वती

क्रिकेटपटू अनाया बांगर हिने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत. यावेळी तिने साडी नेसलेली पाहायला मिळत आहे.भारताचे माजी क्रिकेटपटू (Cricketer)संजय बांगर यांचा मुलगा आर्यन बांगर याने लिंग बदलाची शस्त्रक्रिया केल्यानंतर तो चर्चेत आलाय. संजय बांगर यांचा मुलाने आता अनाया म्हणून स्वत:चं ट्रान्सफॉर्मेशन केलंय. दरम्यान, आज अनायाने पहिल्यांदाच साडी नेसली असून फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

याआधी सोशल मीडियावर तिने अनेक फोटो पोस्ट केले होते, पण त्यामध्ये एकही साडीतील फोटो नव्हता. आता प्रश्न असा निर्माण होतो की, अनाया बांगरने साडी नेसून कोणाची तरी इच्छा पूर्ण केली आहे का? हा प्रश्न का विचारला जातोय, याचं कारण म्हणजे मागच्या महिन्यात, म्हणजेच 2 जुलै रोजी शेअर केलेल्या एका पोस्टवर तिच्या एका चाहत्याने तिला साडीतील फोटो पोस्ट करण्याची विनंती केली होती.

आणि त्या विनंतीनंतर एक महिन्यानंतर, अनाया साडीमधील फोटोसह पुन्हा चर्चेत आली आहे(Cricketer). अनाया बांगरच्या या साडीतील फोटोचा संबंध त्या मागणीशी जोडला जातो, जी एक महिना आधी तिच्या एका फॅनने केली होती. अनाया बांगरने 6 ऑगस्ट रोजी साडीतील फोटो पोस्ट केला आहे. त्यासोबतच तिने त्या साडीविषयी खास गोष्टही सांगितली आहे. ती साडी तिच्या आईची आहे. चाहत्यांनी अनायाच्या पोस्टवरुन लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय.

हे नाकारता येणार नाही की अनाया बांगर साडीमध्ये सुंदर दिसत नाही. ती फारच सुंदर दिसते आहे. त्यामुळेच तिच्या एका चाहत्याने तिला “सुंदरी” असं नावही दिलं आहे.सोशल मीडियावर सतत सक्रिय असलेली अनाया बांगर आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सोशल मीडियावर शेअर करत असते. मग ते पारंपरिक भारतीय पोशाखात सजणं-सावरणं असो किंवा मेहंदी लावण्याचा क्षण. अनाया बांगरचे सर्वच रूप तिच्या इंस्टाग्रामवर पाहायला मिळतात. मात्र, पहिल्यांदाच ती साडीतील रूपात सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

हेही वाचा :

सावधान! खात्यात आले अनपेक्षित करोडो रुपये खर्च केल्यास होईल तुरुंगवास
बँक नोकरीची संधी! स्टेट बँकेत 6589 ज्युनिअर असोसिएट पदांची मोठी भरती
शेतकऱ्यांनो लक्ष द्या! ‘या’ ID शिवाय मिळणार नाही पीएम किसान योजनेचा लाभ