घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान चहलची आणखी एक पोस्ट, म्हणाला “खरं प्रेम…”

भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी, प्रसिद्ध कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या(divorce) चर्चांना सध्या सोशल मीडियावर उधाण आले आहे. अशातच, युजवेंद्र चहलने शेअर केलेल्या एका इन्स्टाग्राम पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टमध्ये त्याने स्वतःचे काही फोटो शेअर केले असून, त्यासोबत लिहिलेले कॅप्शन विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.

चहलच्या या कॅप्शनमधून त्याने अप्रत्यक्षपणे धनश्रीला टोला लगावला असल्याचा अंदाज नेटकरी लावत आहेत. युजवेंद्र आणि धनश्रीच्या घटस्फोटाच्या(divorce) चर्चा सुरू झाल्यापासून, चहल सोशल मीडियावर एकापाठोपाठ एक सूचक पोस्ट शेअर करत आहे. या सर्व पोस्ट लक्ष वेधून घेत आहेत.

मंगळवारी (२1 जानेवारी) चहलने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले. या फोटोंपेक्षा त्याने दिलेले कॅप्शन अधिक चर्चेत आले आहे. त्याने लिहिले आहे की, “खरं प्रेम दुर्मिळ होत चाललं आहे आणि मी स्वतः दुर्मिळ आहे.” यासोबत त्याने एक हसणारा इमोजीदेखील शेअर केला आहे.

चहलच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींच्या मते, त्याने हे कॅप्शन पत्नी धनश्रीला उद्देशून लिहिले आहे. तर काहींना वाटते की, हा फक्त एक योगायोग आहे.

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्यातील नात्याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. दोघांनीही याबद्दल अद्याप कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही. त्यामुळे, त्यांच्या नात्याचे नेमके सत्य काय, हे अद्याप अनुत्तरित आहे. मात्र, चहलच्या या पोस्टमुळे त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांना आणखीनच बळ मिळाले आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी! वाल्मिक कराडला न्यायालयाचा मोठा झटका

“महाराष्ट्र आता थांबणार नाही…”, ! देवेंद्र फडणवीसांचा ४.९९ लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

BCCI चा पाकिस्तानला पुन्हा एकदा दणका! रोहित शर्मासंदर्भात मोठा निर्णय