वाहतूक पोलिसांची मनमानी: इचलकरंजीतील टाकवडे रोडवरील घटनेने जनतेत संताप

इचलकरंजी: शहरातील वाहतूक पोलिसांनी कोणत्याही ठिकाणी(Road) उभे राहून गाड्या अडवून पावत्या (चलन) केल्याची अनेक तक्रारी आल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.

विशेषतः ९ तारखेला टाकवडे रोडवरील एका घटनेने या विषयावर (Road)अधिक प्रकाश टाकला आहे. गावभाग पोलीस स्टेशनचे एक अधिकारी इचलकरंजीला लागून असलेल्या ओड्याच्या पुढे, चलन मशीन हातात घेऊन गाड्यांचे चलन करताना आढळून आले.

या घटनेमुळे वाहतूक पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या अधिकाऱ्यांना वरिष्ठांकडून तशा प्रकारे पावत्या करण्याची आदेश मिळाले होते का? वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी निश्चित ठिकाणं निश्चित केलेली आहेत का?

या प्रकरणाची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने करावी आणि आवश्यक ते उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शहरातील वाहतूक व्यवस्थेचा सुधारणा होण्याच्या दृष्टीने हे गरजेचे आहे.

या घटनेमुळे वाहतूक पोलिसांची मनमानी आणि बेकायदेशीर पावत्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची त्वरित दखल घेऊन नागरिकांमध्ये निर्माण झालेला संताप दूर करणे गरजेचे आहे.

हेही वाचा :

कोल्हापूर : तर एसटी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

मोठी बातमी : दिशा सालियन प्रकरणात नितेश राणे यांची चौकशी

वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाईपेक्षा अपघात प्रतिबंधावर लक्ष केंद्रित करावे, नागरिकांची मागणी