कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्लीत जेवढे गाजले नाही (making)तेवढे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून गाजते आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज गाड्या दिल्या तर एक पद मिळते असा सणसणाटी आरोप विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी नवी दिल्लीत बोलताना केल्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत आणि अजूनही उमटत आहेत. ठाकरे यांच्यावर आरोप करताना साहित्य संमेलनाचे व्यासपीठ वापरणे हे योग्य होते काय अशीही चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये राजकारण्यांनी सहभागी होणे उचित आहे काय? हा अनेक वर्षापासून विचारला जाणारा प्रश्न आहे आणि साहित्य संमेलनाला अगदी व्यासपीठावर हजेरी लावून राजकारण्यांनी त्याचे उत्तर दिलेले आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे (making)स्वागताध्यक्ष तर ज्येष्ठ नेते शरद पवार हेच होते. कराड येथे झालेल्या साहित्य संमेलनात बोलताना ज्येष्ठ साहित्यिका दुर्गा भागवत यांनी राजकारण्यांना फटकारले होते. तेव्हापासून या विषयावर चर्चा होते आहे.
नवी दिल्ली येथील साहित्य संमेलनात एका परिश्रवादाच्या माध्यमातून बोलताना डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी राजकीय भाष्य करताना उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दोन मर्सिडीज गाड्या दिल्या की एक पद ठाकरे यांच्याकडून दिले जाते असा त्यांचा आरोप होता. त्यावर आता महाराष्ट्राच्या राजकीय मंचावर उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. नीलम गोऱ्हे यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करावयास नको होते. पण त्यांनी तो मूर्खपणा केला आहे अशी टीका शरद पवार यांनी केली आहे. नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यानंतर, पुणे (making)शहरात त्यांच्या निवासस्थानासमोर ठाकरे गटाच्या महिलांनी जोरदार निदर्शने केली होती.ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार संजय राऊत, अंबादास दानवे, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,
माजी मंत्री रामदास कदम, विद्यमान मंत्री नितेश राणे हे सर्व राजकारणी डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्या आरोपानंतर व्यक्त झालेले आहेत.
नीलम गोऱ्हे यांना शिवसेनेने चार वेळा विधानपरिषदेवर नियुक्त केले होते, त्यांना उपसभापती बनवले होते, आणि आता त्या ठाकरे यांच्यावर उलटल्या आहेत. त्या खाल्ल्या घरचे वासे मोजत आहेत. त्या स्वतः विधिमंडळात प्रश्न मांडण्यासाठी, लक्षवेधी सूचना दाखल करून घेण्यासाठी पैसे घेत होत्या. महिला कार्यकर्त्यांकडे त्या पैठणी साड्यांची मागणी करत असायच्या. अशा प्रकारची टीका आणि आरोप त्यांच्यावर केले जात आहेत.डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी केलेले आरोप 100% सत्य आहेत. त्या काहीही चुकीचे बोलल्या नाहीत. ठाकरे कुटुंबीयांना स्वतःच्या पैशाने वस्तू खरेदी करायची सवय नाही. मी त्याचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे तर मातोश्री वरील विजेची बिले तसेच अन्य प्रकारचे खर्च माझे वडील करायचे. त्यांच्या घरी असलेला एसी हा सुद्धा व्हिडिओकॉन कंपनीचा आहे.
आणि या कंपनीचे मालक राजकुमार धूत हे शिवसेनेचे राज्यसभेवरील खासदार होते. मातोश्री ला सर्व काही फुकट घ्यायची नेहमीची सवय आहे अशी घनाघाती टीका नितेश राणे यांनी केली आहे.अशाच प्रकारचा आरोप माजी मंत्री रामदास कदम यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर केलेला आहे.शिवसेनेत पद मिळवण्यासाठी डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी खरोखरच दोन मर्सिडीज गाड्या भेट म्हणून दिल्या असतील तर त्या खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे पैसा कुठून आला? वैध मार्गाने मिळवलेल्या पैशातून त्यांनी या गाड्या खरेदी केल्या असतील तर त्यांच्याकडे त्याचे काही निश्चित पुरावे असले पाहिजेत. शिवसेनेला जय महाराष्ट्र करताना त्यांनी तेव्हा दिलेले कारण हे व्यक्तिगत स्वरूपाचे होते. त्यांच्या मातोश्रींचे अर्थात डॉक्टर गोऱ्हे यांच्या मातोश्रींचे निधन झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांचे साधे फोनवरून सुद्धा सांत्वन केले नव्हते. या नाराजीतूनच आपण शिवसेनेला जय महाराष्ट्र केला असा खुलासा तेव्हा त्यांनी केला होता.
वास्तविक तेव्हाच त्यांनी मर्सिडीज गाड्यांचे प्रकरण किंवा आरोप करणे अपेक्षित होते. हा आरोप करण्यासाठी त्यांनी दिर्धन वर्षांचा गॅप का घेतला हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.वैधानिक पद मिळवण्यासाठी डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी मर्सिडीज गाड्यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना लाच दिली असेल तर तो त्यांच्याकडूनही झालेला गुन्हाच आहे असे समजले पाहिजे. कारण लाच देणारा सुद्धा हा तितकाच जबाबदार असतो.एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील आपले स्थान बळकट करण्यासाठी उद्धव ठाकरे यांना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून खुश केले असेल तर त्याचेही समर्थन करता येणार नाही.
रामदास कदम हे म्हणतात की मातोश्री ला मिठाई देऊन देऊन मी थकलो होतो. आता ही मिठाई देण्यामागे त्यांनाही आपले पद किंवा आपले स्थान टिकवून ठेवावयाचे होते असे म्हणता येईल. नितेश राणे हे आपल्या वडिलांचा दाखला देऊन मातोश्री ला काय काय द्यावे लागत होते याची यादी दिली आहे.
डॉक्टर नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेले आरोप हे चुकीचे नाहीत. ती वस्तुस्थिती आहे अशा शब्दात त्यांच्या वक्तव्याचे समर्थन एकनाथ शिंदे, रामदास कदम
हेही वाचा :
घटस्फोटापूर्वी चहलला धनश्रीबद्दल कळले होते सत्य जगासमोर व्यक्त केले आपले दुःख
स्वयंपाक झाला की गॅसवर मीठ नक्की टाका अन्… महिलेनं सांगितले चमत्कारीक फायदे
रेझर वापरल्याने होतील त्वचेच्या समस्या, तुमच्या त्वचेसाठी काय आहे धोका?