3 मोठ्या ग्रहांचे राशी परिवर्तन! या 5 राशींसाठी ठरेल फलदायी…

zodic

प्रत्येक ग्रह हा ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करतो. ग्रहांचं राशांतर (zodiac)  हे मानवी जीवनावर अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम करतं, असं ज्योतिष शास्त्र सांगतं. त्यामुळे ग्रहांचे बदल कसे ठरतील, हे जाणून घेण्याची प्रत्येकाला उत्सुकता असते. मार्च महिन्यात देखील काही महत्वाचे ग्रह राशी परिवर्तन करत आहेत. ज्योतिष अभ्यासकांच्या मते, ग्रहांचं हे गोचर मानवी जीवनावर निश्चित परिणाम करणारं ठरणार आहे. मार्चमध्ये प्रामुख्यानं बुध, रवी आणि शुक्र हे ग्रह राशी परिवर्तन करत आहेत. हे गोचर भ्रमण पाच राशींसाठी विशेष फलदायी ठरणार आहे.

महाशिवरात्री पर्वानं मार्च महिन्याला सुरूवात झाली आहे. काही ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे हा महिना विशेष ठरणार आहे. बुध, रवी आणि शुक्र यांच्या गोचराचे परिणाम मानवी जीवनावर होतील. मार्च महिन्यात सर्वात प्रथम बुध राशांतर (zodiac ) करेल. बुद्धी, संवाद, व्यापार आदी गोष्टी बुधाच्या अधिपत्याखाली येतात. बुध ग्रहाने 6 मार्चला सकाळी 11 वाजून 31 मिनिटांनी मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश केला अजून 18 मार्चला बुधाचा अस्त होईल. त्यानंतर 24 मार्चला तो मीन राशीत गोचर करेल. 15 मार्चला सकाळी 12 वाजून 31 मिनिटांनी रवी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करेल. भौतिक सुख, कलांचा कारक असलेला शुक्र हा ग्रह 31 मार्चला सकाळी 8 वाजून 54 मिनिटांनी कुंभ राशीत प्रवेश करेल. बुध, रवी आणि शुक्राच्या या राशी परिवर्तनामुळे मानवी जीवनात अनुकूल आणि प्रतिकूल असे बदल पाहायला मिळू शकतात. त्यातही पाच राशींसाठी हे गोचर विशेष फलदायी ठरेल, असं ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासकांनी सांगितलं.

मेष (Aries) : या तीन ग्रहांच्या प्रभावामुळे मेष राशीच्या जातकांना मार्च महिना उत्तम फलदायी ठरण्याची शक्यता आहे. या ग्रहांमुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि उत्पन्नाचे स्त्रोतही वाढतील. तुमचा बचतीकडे कल वाढेल तसेच करिअरमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी विशेष मेहनत केल्यानं नोकरदार लोकांची प्रशंसा होईल. काही जातकांना अडकलेले पैसे परत मिळतील.

वृषभ (Taurus) : ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे वृषभ राशीच्या लोकांच्या कौटुंबिक जीवनात अनुकूलता येईल. त्याचवेळी धनवृद्धी करून जीवन सुरक्षित करण्याकडे तुमचा कल असेल. काही जातकांना जुन्या गुंतवणूकीतून धनलाभ होईल. एखादं रेंगाळलेलं काम या कालावधीत वेगानं आणि यशस्वीरित्या पूर्ण करू शकाल. सरकारी नोकरी करणाऱ्यांना पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे.

मिथुन (Gemini) : मिथुन राशीच्या लोकांना या ग्रहांचा प्रभाव पैशाच्या दृष्टीने उत्तम फलदायी ठरेल. नोकरदार वर्गाला पगारवाढ मिळेल, तर व्यावसायिकांना चांगला नफा कमावण्याच्या संधी मिळतील. या कालावधीत काही जातक नवीन वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदीचा विचार करू शकतात. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना या महिन्यात एखाद्या चांगल्या कंपनीत नोकरी मिळू शकते.

तुळ (Libra) : या तीन ग्रहांमुळे या राशीच्या व्यक्तींच्या वैयक्तिक आयुष्यात शुभ फळे मिळण्याचे योग आहेत. तसेच विवाहित जातकांना जोडीदाराची उत्तम साथ मिळाल्याने त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात चांगली कामगिरी करता येईल. तुळ राशीच्या जातकांना मार्च महिन्यात पदोन्नती किंवा पगारवाढ मिळण्याची शक्यता अधिक आहे. व्यावसायिक लोक व्यवसाय विस्ताराच्या माध्यमातून आपले स्रोत वाढवू शकतील.

धनू (Sagittarius) : ग्रहांच्या स्थितीमुळे धनु राशीच्या (zodiac ) लोकांच्या जीवनात राजयोगासारखी शुभ स्थिती निर्माण होईल. या काळात पैशांची आवक अपेक्षापेक्षा अधिक होईल. या कालावधीत तुमच्या संपत्तीत वाढ झाल्याने तुम्ही मोठ्या कर्जातून मुक्त होऊ शकेल. न्यायालयात एखादी केस सुरु असेल तर या महिन्यात त्याचा निर्णय तुमच्या बाजूनं होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :


आधी तिच्या पैशांवर कमाई अन् शेवटी जीव जाईपर्यंत मारहाण…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *