देवास : भाजपच्या माजी आमदाराच्या(political) मुलाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर माजी आमदाराच्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पत्नीच्या छळाला कंटाळून त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. विष प्राशन केले.

माजी आमदाराच्या मुलाने आत्महत्येआधी तब्बल चार पानी चिठ्ठी लिहिली. त्याने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये कधीही कोणी लग्न करू नये असं लिहिलं आहे. तसंच आत्महत्येच्या कारणासह अनेक गोष्टींचा खुलासा त्याने चिठ्ठीत केला आहे. मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातील भाजप नेते आणि माजी आमदार सुरेंद्र वर्मा यांच्या मुलाने उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रमोद वर्मा याने आत्महत्या करण्याच्या प्रयत्नानंतर एकच गोंधळ उडाला आहे.
भाजपचे(political) माजी आमदार सुरेंद्र वर्मा यांचा मुलगा प्रमोद वर्मा याने पत्नीच्या छळाला कंटाळून विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्याकडे चार पानी सुसाईड नोट आढळली. त्या नोटमध्ये त्याने अनेक हैराण करणाऱ्या गोष्टीही लिहिल्या आहेत.
नेमकं काय घडलं?
शुक्रवारी रात्री प्रमोद वर्मा आणि त्याच्या पत्नीमध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर तरुणाने हे टोकाचं पाऊल उचचलं होतं. विष पियाल्याने तरुणाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देण्यात आली आहे.
सुसाईड नोटमध्ये तरुणाने लिहिलंय, सरकारने बेटी बचाओ-बेटी पढाओ बंद करावं, यामुळे अनेक घरं उद्ध्वस्त झाली आहेत. तसंच त्याची पत्नी आणि सासरचे लोक त्याचा कशाप्रकारे छळ करत होते, हेदेखील त्याने नोटमध्ये लिहिलं आहे.
मी माझं आयुष्य संपवत आहे, माझ्या मृत्यूसाठी माझी पत्नी, सासू आणि मेहूणा हे जबाबदार आहेत. माझं लग्न २००९ मध्ये झालं होतं. या तिघांनी माझा मानसिकरित्या छळ केला आहे. माझं कुटुंब सन्मानित आहे. आमचं कधी कोणाशी वैर नाही. माझे वडील आमदार होते, त्यांनी कधीही आपल्या पदाचा गैरवापर केला नाही.
प्रमोद वर्मा या तरुणाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, २००९ मध्ये लग्न झाल्यानंतर लग्नाच्या एका वर्षभरातच प्रमोद आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद होऊ लागले होते. त्याची पत्नी त्याला इंदौरमध्ये राहण्यासाठी दबाव टाकत होती. दोघंही कुटुंबापासून वेगळे एका फ्लॅटमध्ये राहत होते. शुक्रवारी दोघांमध्ये मोठा वाद झाला आणि त्यातूनच भाजप नेत्याच्या मुलाने हे पाऊल उचललं असल्याची घटना घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :
चॅम्पियन ट्रॉफी सुरु असताना पाकिस्तानात बॉम्बस्फोट
मेट्रो स्टेशनवर खुल्लमखुल्ला रोमान्स जोडप्याचा किस करतानाचा VIDEO व्हायरल
पत्नीने छळ केल्यामुळे TCS मॅनेजरने संपवलं जीवन video viral