३ वर्षांपासून ऑडिशन सुरू, ती १००% दयाबेन…; दिशा वकानी ऐवजी कोण येणार ?

जेठालालच नाही तर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोचे लाखो चाहते ‘दया’ची वाट पाहत आहेत. दया बेन(audition) मालिकेतील सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वाधिक चर्चेत राहणारं पात्र आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून दयाबेन शोमध्ये नाही. मालिकेत दयाबेनची भूमिका अभिनेत्री दिशा वाकाणीने साकारली होती. पण तिने प्रेग्नेंसीमुळे शोमधून ब्रेक घेतला होता.

दिशाला पुन्हा मालिकेत आणण्याचे निर्मात्यांकडून प्रयत्न झाले. मात्र तिने कुटुंबीयांना(audition) प्राधान्य देत मालिकेत येण्यास नकार दिला. मालिकेत दयाबेनच्या कमबॅकची प्रेक्षकांना उत्सुकता असताना दयाबेनबद्दल अभिनेत्री जेनिफर मिस्त्री हिने मोठा खुलासा केलेला आहे.

या व्हिडीओमध्ये जेनिफर म्हणते, “शोचे निर्माते गेल्या तीन वर्षांपासून एका मुलीची दयाबेनच्या व्यक्तिरेखेसाठी ऑडिशन घेत आहेत. ती मुलगी 100% दया बेनसारखीच दिसते. निर्माते तिला ऑडिशनसाठी दिल्लीहून मुंबईमध्ये बोलवतात. तिचं वय २८ ते २९ वर्षे असेल. त्यामुळे इतर पात्रांच्या तुलनेत तिच्या वयातील फरक लगेच दिसून येतो. कदाचित याच कारणामुळे तिची निवड होऊ शकत नाहीये. पण ती हुबेहूब दयासारखीच दिसते.”

जेनिफर पुढे म्हणाली, “आमची त्या नवीन मुलीसोबत मॉक टेस्टही झालेली आहे. दिलीप जी (जेठालाल) आणि टप्पू सेनेचंही त्या मुलीसोबत वेगवेगळं मॉक शूट झालं होतं. पण त्या मुलीचा चेहरा जरा वेगळा आहे, पण ज्यावेळी ती दयाबेनच्या गेटअपमध्ये दिसते, त्यावेळी तुम्हाला वाटणारच नाही की, ही दुसरी दयाबेन आहे. पुर्वीच्या दयाबेनमध्ये आणि नव्या दयाबेनमध्ये तुम्हाला अजिबात फरक जाणवणार नाही.”

दया बेनच्या कास्टिंगबाबत जेनिफरने हा महत्वाचा खुलासा केला असला तरीही प्रॉडक्शन हाऊसकडून याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी दिलेली नाही. असित मोदी यांनी दयाबेनला लवकरच शोमध्ये आणणार असल्याचे सांगितले. पण दयाबेन ही दिशा वाकानी असेल की दुसरी कोणी नवी अभिनेत्री याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.

हेही वाचा :

इचलकरंजीत तरुणाचा पाठलाग करून खून….

आजचे राशी भविष्य (14-05-2024)

तळीरामांसाठी महत्वाची बातमी! मतमोजणीच्या निकालापर्यंत मद्यविक्री बंदीचा आदेश