5000 चार्जिंग स्टेशन्स उभारणार, 25 टक्के वाहने ही इलेक्‍ट्रिक असणार – अजित पवार

Electric vehicle

 राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज 2022-23 चा अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात इलेक्‍ट्रिक वाहन(Electric vehicle) धोरणासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. ई-वाहन धोरण- सन 2021 ते 2025 साठी महाराष्ट्र इलेक्‍ट्रिक वाहन धोरण मंजूर करण्यात आले आहे.

यामुळे आता एसटी, रिक्षा, सिटी बस, टॅक्‍सी या सार्वजनिक वाहतुकींच्या वाहनांमध्ये आता 25 टक्के वाहने ही इलेक्‍ट्रिक असणार आहेत.

एप्रिल ते डिसेंबर 2021 या कालावधीत राज्यातील इलेक्‍ट्रिक वाहनांची(Electric vehicle) नोंदणी 157 % ने वाढली आहे. सन 2025 पर्यंत नवीन वाहन नोंदणीत इलेक्‍ट्रिक वाहनांचा हिस्सा 10 टक्के व मोठ्या शहरांच्या सार्वजनिक वाहतुकीतील हिस्सा 25 टक्के करण्याचे उद्दिष्ट आहे. सन 2025 पर्यंत 5 हजार चार्जिंग सुविधांच्या उभारणीचे उद्दीष्ट आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

Smart News:-

शेन वॉर्न यांच्या पार्थिवावर ३० मार्चला एमसीजीवर होणार अंत्यसंस्कार


जिथं फडणवीस तिथं यश हे समीकरणच बनलंय, पाटलांनी सांगितलं गणित


RBI चा paytm बँकेला मोठा झटका, घातली ‘ही’ बंदी!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *