Electric Scooter घेणार्‍यांसाठी खुशखबर…

electric scooter

ओला इलेक्ट्रिक (Ola electric scooter ) आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी एक नवीन फीचर आणत आहे. याअंतर्गत युजर्स आपली स्कूटर अवघ्या 5 मिनिटांत चार्ज करू शकतील. यासाठी कंपनीने इस्रायली कंपनीशी हातमिळवणी केली आहे. ओला इलेक्ट्रिकने सोमवारी सांगितले की, त्यांनी इस्रायलची सेल तंत्रज्ञान कंपनी स्टोअरडॉटमध्ये गुंतवणूक केली आहे.

अत्यंत जलद चार्जिंग सोल्यूशन्ससह बॅटरी तयार करण्यात ही कंपनी अग्रणी आहे. ओला ने भारतात आपले दोन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केले आहेत, ज्यामध्ये ओला एस 1 (Ola S1) आणि ओला एस 1 प्रो (Ola S1 Pro) यांचा समावेश आहे. या गाड्यांना भारतीय बाजारात चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ओला इलेक्ट्रिकने (electric scooter) एका निवेदनात म्हटले आहे की, स्टोअरडॉटमधील गुंतवणूक ही कंपनीने नियोजित केलेल्या अनेक जागतिक धोरणात्मक गुंतवणुकीपैकी पहिली गुंतवणूक आहे. या गुंतवणुकीचा उपयोग प्रगत सेल केमिकल सायन्स आणि मॅन्युफॅक्चरिंग, तसेच इतर बॅटरी तंत्रज्ञान आणि नवीन ऊर्जा प्रणालींमध्ये त्याच्या मूळ R&D चा विस्तार करण्यासाठी केला जाईल.

या गुंतवणुकीच्या मदतीने, ओला इलेक्ट्रिकला कंपनीच्या विशेष तंत्रज्ञान XFC बॅटरी तंत्रज्ञानामध्ये प्रवेश मिळेल, हे तंत्रज्ञान केवळ 5 मिनिटांत 0-100 टक्के बॅटरी चार्ज करण्यास सक्षम असेल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, स्टोअरडॉटला भारतात फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान एकत्रित करणार्‍या बॅटरीच्या निर्मितीचे विशेष अधिकार असतील.

ओला इलेक्ट्रिक ही कंपनी भारतातील टॉप पाच इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादकांपैकी एक आहे. ओला इलेक्ट्रिकला त्यांच्या S1 आणि S1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटर लाँच झाल्यापासून खूप मागणी आहे. फेब्रुवारीमध्ये ओला इलेक्ट्रिकने नोंदणीत मोठी झेप घेतली आहे. गेल्या महिन्यात कंपनी 3,904 युनिट्स वितरित केल्या आहेत.


हेही वाचा :


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *