नवी इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, जाणून घेऊयात अधिक…

इलेक्ट्रिक वाहन कंपनी बॅटरने (BattRE) नवीन इलेक्ट्रिक स्कूटर(scooters) लॉन्च केली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरला बॅटर स्टोरी (BattRE Storie) असे नाव देण्यात आले आहे. एका चार्जमध्ये ही स्कूटर 132 किमी अंतर कापेल असा दावा कंपनीने केला आहे. (electric vehicle company batter batre launches new electric scooter)

ओला इलेक्ट्रिक, हिरो इलेक्ट्रिक, ओकिनावा, प्युअर ईव्ही यांसारख्या कंपन्यांशी हीची स्पर्धा असेल. बेटर स्टोरी इलेक्ट्रिक स्कूटरची (scooters)किंमत भारतात 89,600 रुपये (एक्स-शोरूम) आहे. पण राज्यांमध्ये उपलब्ध सबसिडीमुळे किंमतीवर सवलत मिळेल.

टॉप स्पीड – 65kmph

बॅटर स्टोरी इलेक्ट्रिक स्कूटर मेटल पॅनल्सने बनलेली आहे आणि लुकास टीव्हीएस मोटरद्वारे चालविली जाते. ही इलेक्ट्रिक स्कूटर 5 रायडिंग मोडसह येते. इको, कम्फर्ट, स्पोर्ट, रिव्हर्स आणि पार्किंग असे पाच मोड्स यात आहेत. इलेक्ट्रिक स्कूटर फॉलो-मी-होम लाइट फीचर आणि एलईडी टेल लॅम्पसह येते. हिचा टॉप स्पीड 65 kmph असल्याचे कंपनीने सांगितले.

ही स्कूटर AIS 156 अप्रूव्ड 3.1kWh बॅटरी पॅकने सुसज्ज आहे. यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि टर्न बाय टर्न नेव्हिगेशनसह इंटिग्रेटेड स्मार्ट स्पीडोमीटरसारखी वैशिष्ट्य आहेत. आणखी एक खास गोष्ट म्हणजे यात रायडिंग दरम्यान कॉल अलर्टची सुविधाही दिली आहे. यामध्ये कनेक्टेड ड्राइव्ह फीचर्स देण्यात आलेत, जे जवळचे चार्जिंग स्टेशन्स शोधण्यात मदत करतील.

ही स्कूटर टेस्टिंग दरम्यान सुमारे एक लाख किलोमीटर चालवण्यात आल्याचे कंपनीने सांगितले. या स्कूटरची एक लाख किलोमीटरपर्यंत चाचणी घेण्यात आली कारण गेल्या काही आठवड्यात आग लागण्याच्या काही घटना समोर आल्यात, त्यामुळे अशा दुर्घटना टाळण्यासाठी स्कूटरच्या सुरक्षेकडे जास्त लक्ष दिले जात आहे.

हेही वाचा:


टीम इंडियाच्या स्टार खेळाडूकडे Good News!

Leave a Reply

Your email address will not be published.