ऑगस्टमध्ये लॉन्च होणार ‘या’ जबरदस्त कार

या महिन्यात देशात अनेक जबरदस्त कार लॉन्च (first car) होणार आहेत. जर तुम्हीही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला या महिन्यात बाजारात येणाऱ्या कारच्या यादीबद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्ही तुमच्या पसंतीनुसार स्वतःसाठी सर्वोत्तम कार निवडू शकता.

New Maruti Suzuki Alto
मारुती सुझुकीच्या या कराल गेल्या अनेक वर्षांपासून लोकांची पसंती आहे. मारुतीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी ही एक (first car) आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी या महिन्यात 18 ऑगस्ट रोजी या कारचा नवीन अवतार सादर करणार आहे. आगामी सणासुदीच्या हंगामात याची विक्री सुरू होण्याची अपेक्षा आहे. ही कार सध्याच्या मॉडेलपेक्षा आकाराने मोठी असेल आणि याची किंमत सुमारे 3.5 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.

Toyota Hyryder
टोयोटाची ही एसयूव्ही लवकरच लॉन्च होणार आहे. कंपनी याची किंमतही कमी ठेवू शकते. या आगामी कारची किंमत 9.5 लाख रुपयांपर्यंत असण्याचा अंदाज आहे. याच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, एलईडी हेडलॅम्प, कनेक्टेड तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक सनरूफ तसेच अनेक ड्रायव्हिंग मोड्स सारखे फीचर्स मिळतील.

Mahindra Born EV
महिंद्रा आपली पहिली ‘बॉर्न इलेक्ट्रिक’ SUV चे 15 ऑगस्ट 2022 अनावरण करणार आहे. महिंद्रा लॉन्च करणार असलेल्या पाच इलेक्ट्रिक कार पैकी ही एक असणार आहे. महिंद्राची ‘बॉर्न इलेक्ट्रिक’ एसयूव्ही कार कंपनी 2027 पर्यंत बाजारात आणणार आहे.

दरम्यान, मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) युरोपमध्ये नेक्स्ट जेन सुझुकी स्विफ्टची (Swift) टेस्टिंग सुरू केली आहे. मारुती या हॅचबॅकचे नवीन मॉडेल या वर्षाच्या अखेरीस जागतिक बाजारात लॉन्च करू शकते. ही कार भारतात 2023 च्या सुरुवातीला लॉन्च केली जाऊ शकते. ही कार हायब्रिड पॉवरट्रेनसह येईल.

Smart News :


संजय राऊतांनी अलिबागमध्ये 3 कोटींना 10 भूखंड घेतले

Leave a Reply

Your email address will not be published.