इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये कशी लागली आग? सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये;

Electric Scooter

पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीनंतर लोकांनी अन्य पर्याय शोधण्यास सुरूवात केली आहे. अनेक जण सध्या इलेक्ट्रीक(Ola Electric Scooter) वाहनांकडे वळताना दिसतायत. सरकारही इलेक्ट्रीक वाहनांच्या खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक हातभार लावत आहे. परंतु Ola Scooter आणि Okinawa Scooter ला लागलेल्या आगीच्या घटनांवरुन सरकारच्या या प्रयत्नांना झटका दिला आहे. सरकारनं याला गंभीरतेनं घेत DRDO ला तपास करण्याचे निर्देश दिले आहेत.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) सेंटर फॉर फायर एक्सप्लोझिव्ह अँड एन्व्हायर्नमेंट सेफ्टी युनिट पुण्यातील ओला स्कूटर (Ola Scooter) आणि वेल्लोरमधील ओकिनावा स्कूटरला आग लागलेल्या घटनांचा तपास करणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानं यासंदर्भात एक अधिसूचना काढली आहे. नितीन गडकरी यांच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने CFEES ला या घटनेचं कारण तसंच अशा घटना रोखण्यासाठी अधिक चांगल्या उपाययोजना सुचवण्यासदेखील सांगितलं आहे.

“सरकारनं ओला इलेक्ट्रीक स्कूटर (Ola Electric Scooter) मध्ये लागलेल्या आगीच्या तपासाचे आदेश दिले आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ या घटनेचा तपास रून आपला अहवाल मंत्रालयाला सोपवतील,” असं यापूर्वी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे सचिव गिरिधर अरमाणे यांनी बिझनेस डुटे टीव्हीशी बोलताना सांगितलं होतं.

आग लागल्यानं खळबळ
निळ्या रंगाच्या एका ओला एस १ प्रो इलेक्ट्रिक स्कूटरला पुण्यामध्ये आग लागल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कंपनीने या घटनेची चौकशी सुरू केली आहे. कंपनीने सर्व स्कूटर मागे घ्याव्यात आणि बदलून द्याव्यात, अशी मागणी आता होत आहे. पुण्यातील या घटनेची आम्हाला माहिती मिळाली. घटनेची चौकशी सुरू केली आहे. कंपनी वाहन सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देते. ही घटना आम्ही गांभीर्याने घेतली आहे. यावर उचित कारवाई करण्यात येईल. याबाबतची अधिक माहिती आगामी काळात जनतेसमोर मांडू, असं कंपनीनं यापूर्वी म्हटलं.

Smart News:-

…अन् मोदी झाले वारकरी!


चीनच्या शांघायमध्ये सर्वात मोठं Lockdown, माणसांसह प्राण्यांच्याही फिरण्यावर बंदी


हिंदू सण जल्लोषात साजरे करण्याची परवानगी द्या; भाजपाची मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *