भारताची पहिली मेनस्ट्रीम स्ट्राँग हायब्रीड इलेक्ट्रिक व्हेइकल

electric vehicle

होंडा कंपनीने भारताची प्रथम मेनस्ट्रीम स्ट्राँग हायब्रीड इलेक्ट्रिक व्हेइकल (electric vehicle) ‘न्यू सिटी ई- एचईव्ही’ लॉन्च केली आहे. (Indias first mainstream strong hybrid electric vehicle launched by honda)

नवीन पद्धतीचे सेल्फ-चार्जिंग (Self Charging), उच्च कार्यक्षम टू- मोटर स्ट्राँग हायब्रीड इलेक्‍ट्रिक सिस्टीम, उच्चप्रतीचे परफॉर्मन्स, २६. ५ किलोमीटर/लिटरची अप्रतिम फ्युएल इकॉनॉमी आणि अल्ट्रा-लो उत्सर्जन, मल्टी-मोड ड्राइव्ह पॉवरट्रेन, ईव्ही ड्राइव्ह मोड, हायब्रीड ड्राइव्ह मोड आणि इंजिन ड्राइव्ह मोड आदी या गाडीचे (electric vehicle) वैशिष्ट्ये आहेत.

होंडाच्या अत्याधुनिक इंटिलीजंट सेफ्टी टेक्नॉलॉजी होंडा सेंसिंगचा क्षेत्रात पहिल्यांदाच जो ड्रायव्हरला सूचना देतो आणि अपघातांचे धोके कमी होतात. होंडा कनेक्ट आता स्मार्टवॉच इंटिग्रेशनसह उपलब्ध आहे. आधीच्या आणि नवीन ग्राहकांसाठी आता ५ व्या जनरेशनची होंडा सिटी पेट्रोल आणि डिझेल मॉडेल्स उपलब्ध आहेत. तिची किंमत रुपये १९ ,४९,९०० (दिल्ली शोरूम) असणार आहे.

ही कार ग्राहकांना प्रमाणित लाभ म्हणून ३ वर्षांची अमर्यादित किलोमीटर वॉरंटी देते. ग्राहक ती कार खरेदीपासून ५ वर्षांसाठी एक्सटेंडेड वॉरंटी किंवा १० वर्षांपर्यंत एनीटाइम वॉरंटी करून घेऊ शकतात. लिथियम आयन बॅटरीवरील वॉरंटी ८ वर्षे किंवा १,६०,००० किलोमीटर (जे पहिले येईल त्याप्रमाणे)ची उपलब्ध आहे.

हेही वाचा :


वॉर्नरच्या गोल्डन डकची ‘अनहोनी कहानी’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *