मार्च 2022 च्या टॉप 10 सर्वाधिक विकल्या जाणार्‍या हॅचबॅक; ‘मारुती सुझुकी’ ने यंदाही बाजी मारली.

Maruti Suzuki

Maruti Suzuki : देशातील पहिल्या क्रमांकाची कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीचे वर्चस्व कार विक्रीमध्ये यंदाही कायम आहे.

भारतीय रस्त्यांवर कंपनीचे वर्चस्व कायम असून, लोकांची पहिली पसंती मारुती सुझुकीला आहे. गेल्या वर्ष 2021 मध्ये, फक्तमारुती सुझुकीच्या कारने देशातील टॉप-10 सर्वाधिक विक्री होणाऱ्या वाहनांमध्ये अव्वल स्थान पटकावले होते. यंदाही तीच परंपरा कायम ठेवीत, मारुती सुझुकीने बाजी मारली आहे. गेल्या महिन्यात, 6 मारुती सुझुकीच्या(Maruti Suzuki) वाहनांनी P-10 सर्वाधिक विक्री होणाऱ्या हॅचबॅक वाहनांमध्ये आपले स्थान निर्माण केले. तर ह्युंदाई आणि टाटाच्या प्रत्येकी दोन वाहनांनी या काळात आपले स्थान निर्माण करता आले. गेल्या महिन्यात मारुती सुझुकी वॅगनआर ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी हॅचबॅक होती.

सर्वाधिक विक्री मारुती सुझुकीची

हॅचबॅक वाहनांची मागणी नेहमीच जास्त राहिली आहे. प्रथमच कार खरेदी करणारा असो किंवा कमी बजेटची समस्या असो, हॅचबॅक कार प्रत्येक बाबतीत सर्वोत्तम आहेत. मारुती सुझुकीकडे या विभागात सर्वाधिक मॉडेल्स आहेत. गेल्या महिन्यात सर्वाधिक विकली जाणारी 5 हॅचबॅक वाहनेही याच कंपनीची आहेत. गेल्या महिन्यात मारुती सुझुकी(Maruti Suzuki) वॅगनआरचे २४,००० हून अधिक मॉडेल्स विकले गेले. तर, या कालावधीत मारुती सुझुकी बलेनोच्या 14,520 युनिट्सची विक्री झाली. त्याच वेळी, 13,623 ग्राहकांनी मारुती सुझुकी स्विफ्ट खरेदी केली. सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप 10 कारमधील सात कार मारुती सुझुकी कुटुंबातील आहेत. 2013 पासून कंपनीच्या किमान पाच गाड्या बेस्ट सेलरच्या यादीत आहेत.

हॅचबॅक कार अजूनही पसंती

2022 मध्ये, SUV वाहनांना भारतीयांची पहिली पसंती असताना, मारुती सुझुकी वॅगन आर ही देशातील क्रमांक एकची सर्वाधिक विक्री होणारी कार होती. गेल्या वर्षी वॅगन आरच्या 183,851 युनिट्सची विक्री झाली होती. लोकांना हॅचबॅक कार आवडत नाहीत असे नाही. त्याऐवजी, हॅचबॅक कार सर्वोत्कृष्ट विक्री करणार्‍यांच्या टॉप-10 यादीत कायम आहे. वॅगन आर नंतर सलग चार हॅचबॅक कारने या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. सर्वाधिक विक्री होणाऱ्या हॅचबॅक वाहनांमध्ये मारुती सुझुकीचे(Maruti Suzuki) एकतर्फी वर्चस्व दिसून आले. तर टॉप-5 मध्ये मारुतीच्या 3 गाड्यांव्यतिरिक्त, ह्युंदाई आणि टाटाच्या 1-1 गाड्यांचा समावेश होता.

सर्वाधिक विकल्या जाणार्‍या हॅचबॅकचा क्रम, किती ग्राहकांनी खरेदी केली? सुरवातीची किंमत टॉप एंड व्हेरियंटची किंमत

1 मारुती सुझुकी वॅगनआर 24,634 युनिट्स रु 5,47,500 रु 7,08,000

2 मारुती सुझुकी बलेनो 14,520 युनिट्स रु. 6.49 लाख रु. 9.71 लाख

3 मारुती सुझुकी स्विफ्ट 13,623 युनिट्स 5.92 लाख रुपये 8.71 लाख

4 टाटा पंच 10,526 युनिट्स रु 5,82,900 रु. 9,48,900

5 Hyundai i10 Grand NIOS 9,687 युनिट्स रु. 5.30 लाख रु. 7.61 लाख

6 मारुती सुझुकी एस-प्रेसो 7,870 युनिट्स रु. 3,99,500 रु. 5.64 लाख

७ मारुती सुझुकी अल्टो ७,६२१ युनिट्स ४.०८ लाख रु. ५.०३ लाख

8 मारुती सुझुकी सेलेरियो 6,442 युनिट्स 5.25 लाख रुपये 7 लाख

9 टाटा अल्ट्रोझ 4,727 युनिट्स रुपये 6.20 लाख रुपये 10.15 लाख

10 Hyundai i20 4,693 युनिट्स रु. 6.98 लाख रु. 10.85 लाख

smart News:-

राज ठाकरे औरंगाबाद दौरा : ‘365 दिवस भोंगे चालू ठेवणं मला योग्य वाटत नाही’


शुभमनची एलॉन मस्कला विनंती, ‘स्विगी सुद्धा विकत घ्या’


शिवसेनेचे मिशन मराठवाडा; उद्धव ठाकरे आक्रमक…


Top 5 Govt Jobs: लेक्चरर, एसओ, अप्रेंटिससह 8000 पदांवर नोकरीची संधी


या 3 चुकीच्या सवयी तुमचं शरीर कमकुवत करतायत


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *