तुम्ही ही बुलेट चे चाहते आहात का? मग ही बातमी वाचाच..!

रॉयल एनफिल्ड कंपनी (royal enfield company) शॅाटगन 650 (Shotgun 650) ही आगामी मोटरसायकल लवकरच लॉंच करण्याच्या तयारीत आहे. रॅायल एनफिल्ड शॅाटगन 650 बाईकचा लुक परदेशात टेस्टिंगदरम्यान पहायला मिळाला. सध्या कंपनीने या नव्या मोटरसायकलच्या निर्मितीला वेग घेतला आहे. रॅायल एनफिल्ड (Royal Enfield) बाईकचा चाहतावर्ग हा भारतात भरपूर पहायला मिळतो.

कसा असेल या नव्या बाईकचा लूक?
या नव्या बाईकचे प्रोटोटाइप मॅाडेल थोडे विकसित पद्धतीद्वारे पहायला मिळेल. काही दिवसांपूर्वी परदेशातील एका रोड- टेस्टिंग दरम्यान ही बाईक पहायला मिळाली. या बाईकच्या पुढील बाजूस बॅाक्स लुक दिलेला दिसून येत आहे.(royal enfield company)

royal enfield company

विशेष म्हणजे यातील संपूर्ण एलईडी हेडलॅम्प युनिट हे आकर्षक डिझाईनपैकी एक आहे, जे रॉयल एनफिल्ड बाईकसाठी नवीन आहे. बाईकची पुढील बाजू हेडलॅम्प कव्हर डिझाइनमुळे आकर्षक दिसून येते. तसेच पूर्वीसारख्याच बल्ब इंडिकेटरचा यामध्ये समावेश आहे.

हे असतील नवी फिचर्स
या बाईकमध्ये ट्विन पॅाड कंसोल दिला गेला आहे. जे याआधीच्या मॅाडेल्समध्ये देखील पहायला मिळतो. यामध्ये ओडोमीटर, स्पीडोमीटर, फ्यूल लेवलच्या रीडआउट यासारखे आवश्यक फिचर्स आहेत. तसेच ट्रिपर नेव्हिगेशन सिस्टम ही नवी टेक्नॅालॅाजी देखील पहायला मिळेल.

royal enfield company

बाईकचे इंजिन कसे असेल?
कंपनीचे हे मॅाडेल 650cc ट्विन-सिलेंडर इंजिनने सुसज्ज असेल. रॅायल एनफिल्डच्या कॅान्टिनेन्टल GT650 आणि इंटरसेप्टर IN650 या बाईकमध्ये हे इंजिन पहायला मिळते.

royal enfield company

सस्पेंशन आणि ब्रेक सिस्टिम
टेस्टिंग दरम्यान मिळालेल्या फोटोनूसार एक महत्त्वपूर्ण गोष्ट ही समजते की, ही बाईक युएसडी फ्रंट फोर्क्स आणि ट्विन रिअर शॅाक्ससह सुसज्ज असल्याचे दिसून येते. पुढच्या बाजूस सिंगल आणि रिअर डिस्कचा वापर करून डिझाईन केल्याचे दिसून येते. तसेच बाईकच्या अलॅाय व्हीलचे डिझाईन हे नव्या आकर्षक रूपातील पहायला मिळतील.

royal enfield company

कधी होणार लॉंच ?
ही नवी बाईक 2023मध्ये भारतात लाँच करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा :


‘होय, शरद पवार साहेब खोटं बोलले’ अस् कोण म्हणालं? व्हिडीओ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *