देशातील सर्वात मोठी मोटार उत्पादक कंपनी ‘मारुती’च्या नफ्यात ५१ टक्के वाढ

Smart News:- देशातील सर्वात मोठी मोटार उत्पादक कंपनी 'मारुती'च्या नफ्यात ५१ टक्के वाढ

Smart News:- देशातील सर्वात मोठी मोटार उत्पादक कंपनी मारुतीच्या या वर्षीच्या जानेवारी ते मार्च या तिमाहीच्या नफ्यात (१,८७६ कोटी रु.) मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत (१,२४१ कोटी रु.) ५१ टक्के वाढ झाली. कंपनीने आज ही माहिती जाहीर केली.ऑक्टोबर ते डिसेंबर २०२१ या तिमाहीत त्यांना १,०४२ कोटी रुपये नफा झाला होता. सेमिकंडक्टर चीपच्या तुटवड्यामुळे त्यांच्या देशांतर्गत विक्रीत आठ टक्के घट झाली आहे; पण कंपनीने या तिमाहीत केलेली ६८,४५४ गाड्यांची निर्यात ही आतापर्यंत कोणत्याही तिमाहीत केलेली सर्वात मोठी निर्यात आहे, असेही कंपनीने म्हटले आहे.

सध्या पोलाद, ॲल्युमिनियम व अन्य महत्त्वाच्या धातूंच्या किमतीत असामान्य वाढ झाल्यामुळे तो तोटा काहीअंशी भरून काढायला आम्हाला वाहनांच्या किमतीही वाढवायला लागल्या, असे कंपनीने म्हटले आहे. सेमीकंडक्टर चीपचा सध्या मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत असल्यामुळे एकंदर वाहनांचे उत्पादनही या वर्षी २ लाख ७० हजारांनी कमी झाले. कंपनीकडे साधारण तेवढ्याच गाड्यांच्या मागण्या प्रतीक्षा यादीवर आहेत.

महसूल – कोटी रु.

  • यंदाची तिमाही २६,७४९
  • मागील वर्षीची हीच तिमाही २४,०३५
  • या वर्षी ११ टक्के वाढ.
  • ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाही २३,२५३
  • यंदा १५ टक्के वाढ

Smart News:-

प्रेमा किरण यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीची मोठी हानी – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख


बेस्ट कर्मचार्‍यांसाठी 13 डेपोत स्वस्तात मस्त जेवण मिळणार


राज ठाकरेंच्या सभेच्या अवघ्या काही क्षणाआधी उद्धव ठाकरेंचा खोचक टोमणा, म्हणाले….


भोंगे काढल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत असतील तर 6 तास नमाज करेन; माजी खासदारांची टीका


राज ठाकरेंच्या सभेकडे राज्याचं लक्ष, थोड्याच वेळात औरंगाबादेत होणार ‘राज गर्जना’

Leave a Reply

Your email address will not be published.