Creta ला टक्कर देण्यासाठी Toyota Hyryder सज्ज!

Smart News:- Creta ला टक्कर देण्यासाठी Toyota Hyryder सज्ज; किती किंमतीत मिळणार? जाणून घ्या

Smart News:- Toyota Kirloskar Motor १ जुलै २०२२ रोजी भारतीय बाजारपेठेसाठी आपली नवीन कॉम्पॅक्ट SUV ची घोषणा करू शकते. रिपोर्ट्सनुसार, कंपनीने मीडियामध्ये ‘ब्लॉक युवर डेट’ आमंत्रण प्रसारित केले आहे.

सुझुकी आणि टोयोटा यांनी त्यांच्या जागतिक भागीदारीचा एक भाग म्हणून तयार केलेल्या आगामी कॉम्पॅक्ट SUV बाबत कंपनीकडून मोठी घोषणा केली जाईल अशी अपेक्षा आहे.

टोयोटाच्या नवीन एसयूव्हीचे नाव
आगामी कॉम्पॅक्ट एसयूव्हीचे नाव टोयोटा हायराइडर(Toyota Hyryder) असण्याची अपेक्षा आहे. कॉम्पॅक्ट एसयूव्ही स्पेसमधील ही नवीन एंट्री टोयोटा-बॅज असलेले पहिले मॉडेल असेल. यानंतर लवकरच मारुती सुझुकीचे बॅज असलेले मॉडेल देखील दिसेल. नवीन पिढीच्या मारुती सुझुकी ब्रेझा लाँच झाल्यानंतर अवघ्या एका दिवसात टोयोटा हायराइडरचे अनावरण केले जाणार आहे हे विशेष आहे.

1.5-लिटर K15B पेट्रोल इंजिन मिळू शकते
वैशिष्टे म्हणजे मारुती सुझुकी विटारा ब्रेझा, एर्टिगा, XL6, एस-क्रॉस आणि टोयोटा अर्बन क्रूझरला उर्जा देणारे 1.5-लीटर K15B पेट्रोल इंजिन Hyryder मध्ये देखील पाहिले जाऊ शकते. ट्रान्समिशन पर्यायांबद्दल बोलायचे झाल्यास, 5-स्पीड मॅन्युअल आणि CVT ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय एसयूव्हीमध्ये आढळू शकतात.

टोयोटा हायडरची बाजारातील स्पर्धा आणि किंमत
एकदा भारतीय बाजारपेठेत एन्ट्री केल्यानंतर, टोयोटा हायराइडरची स्पर्धा Hyundai Creta, Kia Seltos, Volkswagen Taigun आणि MG Astor यांच्याशी होईल. हे कनेक्टेड कार तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. यात टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, हवेशीर सीट, हेड्स-अप डिस्प्ले, 360-डिग्री कॅमेरा, सनरूफ आणि इतर वैशिष्ट्ये मिळतील याची किंमत १० ते १६ लाख रुपयांपर्यंत असू शकते असे मानले जाते.

Smart News:-

‘बॉस माझी लाडाची’ मालिकेत थाटात पार पडणार मिहीर आणि राजेश्वरी यांचा लग्नसोहळा !


दूरदर्शनचा चेहरा हरपला, ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं निधन!


कोल्हापूर : सशस्त्र हल्ल्यात दोघे जखमी!


धनंजय महाडिकांसाठी अख्खं कुटुंब मैदानात!


कोल्हापूर : खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याची आत्महत्या!

 

Leave a Reply

Your email address will not be published.