बॅनर वाद: दोन शिवसेना गट आमने-सामने, आरोप-प्रत्यारोप

दादर पश्चिमेतील फुल मार्केटमध्ये पुन्हा एकदा (Shiv Sena)शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात संघर्ष उफाळला आहे. एका बॅनरवरून सुरू झालेल्या या वादात शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले आहेत.

बॅनरवरून संघर्षाची ठिणगी
फुल मार्केटमध्ये लावण्यात आलेला (Shiv Sena)बॅनर महापालिका अधिकाऱ्यांनी काढण्यास सांगितल्यावर समाधान सरवणकर थेट मार्केटमध्ये पोहोचले. त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत हा निर्णय आमदार सावंत यांच्या हस्तक्षेपामुळे झाल्याचा आरोप केला. यावरून दोन्ही गटांमध्ये वाकयुद्ध पेटले.

आमदार सावंतांचा प्रतिउत्तर
महेश सावंत यांनी समाधान सरवणकरांवर जोरदार टीका करत, “समाधान सरवणकर राजकारणात बालिश आहेत. ते बापाच्या पुण्याईवर नगरसेवक झाले आहेत. लोकांनी त्यांना घरी बसवल्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे,” असे वक्तव्य केले. तसेच “हप्ते घेण्याचा आरोप निराधार आहे. उलट, त्यांनी स्वतःची इतकी घरं कशी कमावली, हे विचारले पाहिजे,” असा खोचक सवाल उपस्थित केला.

शिवसेना वाद आणखी उफाळणार?
पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या वादामुळे दादरमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गट आणि उद्धव गट यांच्यातील हा संघर्ष राजकीय रंग घेऊन येत्या निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे.

बॅनरचा मुद्दा की राजकीय स्वार्थ?
या वादात फुल मार्केटच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले आहे की, बॅनर काढण्याचा निर्णय मार्केट नियमांच्या आधारे घेतला गेला होता. मात्र, या घटनेने शिवसेना गटांमधील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणला आहे.

हेही वाचा :

सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट पोहा कटलेट

सोन्याचे भाव पुन्हा घसरले, चांदीच्या दरात मोठी वाढ!

‘या’ राशींचे भाग्य बदलणार? वाईट काळ संपून नशीब उजळणार, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..