एकनाथ शिंदे अन् अजितदादांबद्दल भाजपच्या बैठकीत मोठा निर्णय

लोकसभा निवडणुकीत ’45 पार’ची वल्गना करणाऱ्या महायुतीचा(politics)गाडा 17 जागांवर थांबला. 2019 मध्ये 23 जागा जिंकणाऱ्या भाजपच्या फक्त 9 जागा निवडून आल्या आहेत. यानंतर महायुतीत शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटावर भाजपचे कार्यकर्ते आणि नेते नाराज असून विधानसभेला स्वबळाची भाषा करण्यात येत आहे.

यातच भाजपच्या(politics) केंद्रीय नेतृत्वानं राज्यातील नेत्यांचे कान टोचले आहेत. “स्वबळावर निवडणूक लढविण्याची भाषा करू नका,” अशा शब्दांत भाजपचे निवडणूक प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी झालेल्या बैठकीत तंबी दिली आहे.

नरिमन पॉइंट येथील प्रदेश कार्यालयात शनिवारी महाराष्ट्र भाजपच्या कोअर ग्रुपची बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबतही मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

“महायुती म्हणून विधानसभा निवडणुकीला समोर जा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करणं बंद करून आतापासून निवडणुकीची तयारी सुरू करा. जिल्हास्तराव भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांशी समन्वय साधा,” अशा सूचना प्रभारींनी नेत्यांना दिल्या आहेत.

हेही वाचा :

.यूजीसी-नेट २०२४ परीक्षा आता ऑनलाइनच, नवीन तारखा जाहीर!

हार्दिक पंड्याच्या अश्रूंचं गूढ काय? ‘मी सहा महिने…’ म्हणत वर्ल्ड चॅम्पियन भावुक

NEET परीक्षा ऑनलाइन होणार? पेपरफुटीच्या घटनांनंतर केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत