कायदा आणि सुव्यवस्थेवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (leader)यांच्या हत्येनंतर हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच आज राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यापालांची भेट घेऊन निवेदन दिलं आहे.

सरपंच संतोष देशमुख प्रकरणात(leader) धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. सर्वपक्षीय शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. माजी खासदार संभाजीराजे, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार बजरंग सोनावणे, आष्टीचे भाजपाचे आमदार (भाजप) सुरेश धस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार संदीप क्षीरसागर आणि ज्योती मेटे यांनी राज्यपालांची भेट घेतली.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी आज सर्वपक्षीय शिष्टमंडळानं राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. बीडमध्ये खंडणी, अपहरण आणि इतर गुन्ह्यांचे प्रमाण वाढलं आहे.
सरपंच संतोष देशमुख प्रकरण हे बीडमधील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे उदाहरण असल्याचे शिष्टमंडळानं राज्यपालांना सांगितलं. पोलिसांच्या कथित निष्काळजीपणा आणि पक्षपातीपणामुळे बीड जिल्ह्यात अशांतता पसरली आहे. राज्यभरातील सार्वजनिक सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे, असे शिष्टमंडळानं म्हटले आहे.
स्वराज्य पक्षाचे नेते संभाजीराजे यांनी म्हटलं, ” आधीच उशीर झाला आहे. या प्रकरणात मुळात महाराष्ट्राला न्याय द्यायचा आहे. हे प्रकरण जातपात आणि राजकारणाच्या पलीकडचं आहे.
संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या होऊनही योग्य न्याय मिळाला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात अशा घटना घडणार आहेत. त्यामुळे आम्ही राज्यपालांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी आहे”.
राष्ट्रवादीचे (एसपी) आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, ” मंत्री धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा. वाल्मिक कराडला 302 मध्ये आरोपी करावे. गुन्हेगारीचं उदात्तीकरण करू नाही. आम्ही घटनात्मक पद्धतीनं धनंजय मुंडेचा राजीनामा मागत आहोत. बीडमध्ये यापूर्वीदेखील गुन्हे घडले आहेत. त्या प्रकरणांची चौकशी व्हावी. तिसऱ्या फरार आरोपीला अटक व्हावी”. “बीड प्रकरणाला जातीय रंग देऊन नये,” असेही आमदार आव्हाड यांनी म्हटलं.
शिवसेनेचे (यूबीटी) आमदार अंबादास दानवे म्हणाले, ” सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्यादेखील गंभीर आहे. सरकार मुंडे आणि कराडला वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. एसआयटीमधील चौकशी अधिकारी आरोपींच्या जवळचे आहेत. सरकार ऐकत नाही म्हणून राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांनी सविस्तर मागणी ऐकली आहे”.
हेही वाचा :
VIDEO मेट्रो सीटवर वाद: दोन मुलींची भिडंत, एकीने कानाखाली ठोकले, दुसरीने केस ओढले”
दीपिका पदुकोणचा ‘कल्की 2898 AD’मधील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
‘मुलांकडे लक्ष देत नाही म्हणून महिलेसोबत केले असे काही…; वाचून व्हाल थक्क