मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख यांना अटक

बीड लोकसभा निवडणुकीतील उमेदवार बजरंग सोनवणे यांना(news) आपण कशाप्रकारे मदत केली असा संवाद असलेली ऑडिओ क्लिप काल बीड जिल्हा बरोबर व्हायरल झाली आणि त्याचा परिणाम धनंजय मुंडे यांचे समर्थक वाल्मीक कराड यांनी परळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली त्यावरून बीड जिल्हा शिवसेना प्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर परळीत गुन्हा दाखल झाला होता.

शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना(news) बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी कथित ऑडियो क्लीप समोर आल्यानंतर बीड -अहमदनगर महामार्गावरील जामखेड येथून त्यांना अटक करण्यात आली असून बीड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना धोका देत खांडे यांनी बजरंग सोनवणे यांचे काम केले होते. याबाबत खांडे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ज्यामध्ये खांडे यांनी या गोष्टीची कबुली देताना मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करून त्यांची गाडी फोडण्याबाबत वक्तव्य केले होते.

ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर परळी आणि बीड पोलिसात वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते. तसेच खांडे याच्यावर काही महिन्यापूर्वी बीड ग्रामीण पोलिसात 307 चा गुन्हा देखील दाखल झाला होता. आता याच गुन्ह्यात खांडे यांना अटक झाली आहे.

दरम्यान, या क्लिपवरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते वाल्मिक कराड यांच्या तक्रारीवरून कुंडलिक खांडे व शिवराज बांगर यांच्या विरुद्ध परळी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी एलसीबी आणि परळीच्या संभाजीनगर पोलिसांची पथक रवाना झाली होती. अखेर खाडे यांना अटक करण्यात आली आहे.

काय आहे व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये?

कुंडलिक खांडे यांच्यासोबत एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची चर्चा चालू असताना निवडणुकीपूर्वीच बजरंग सोनवणे यांना त्यांनी कशी मदत करायची हे सांगतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओतून दोघांमधील संवाद ऐकायला मिळत आहे. तर, दुसरी ऑडिओ क्लिप ही मतमोजणीनंतरची आहे, ज्यामध्ये म्हाळस जवळा या कुंडलिक खांडेंच्या मूळ गावातून पंकजा मुंडेंना मुद्दामून लीड दिली. कारण, ओबीसी मताचा आपल्याला फायदा होऊ शकतो हे सांगत असताना बीड विधानसभा मतदारसंघातील सगळ्या बुथवर कशाप्रकारे बजरंग सोनवणे यांच्यासाठी त्यांनी फिल्डिंग लावल्याचं ते सांगत आहेत. त्यामध्ये, धनंजय मुंडे आणि त्यांचे सहकारी वाल्मिक कराड त्यांच्याबाबतीत बोलत त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याचंही बोलत आहेत.

हेही वाचा :

निसर्गाचा कोप : ढगफुटी म्हणजे काय आणि ती कशी घडते?

समृद्धी महामार्गावर दोन कारची भीषण धडक, 6 ठार

महाराष्ट्र विधानसभेत ‘माऊली’ योजनांची घोषणा: वारकरी, कष्टकरी, आणि शेतकरींसाठी अत्याधुनिक सुविधा आणि निधी