मोठी बातमी! दाभोळकर हत्या प्रकरणातील अंदुरे, कळसकरला जन्मठेप

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या(news) प्रकरणाचा निकाल अखेर 11 वर्षांनी निकाल लागला आहे. यावर पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुनावणी सुरू होती. याप्रकरणातील पाच पैकी तीन आरोपी निर्दोष सुटले आहेत. तावडे, पुनाळेकर आणि भावे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर, सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेप आणि 5 लाख दंड, अशी शिक्षा सुनावली आहे.

डॉ. दाभोलकर यांची शनिवार(news) पेठेतील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर 20 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी सव्वासातच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर संपूर्ण राज्य हादरले होते. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांनी केला. राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) या प्रकरणाचा तपास केला होता.

उच्च न्यायालयाच्या आदेशाने जून 2014 मध्ये या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्यात आला होता. 15 सप्टेंबर 2021 रोजी विशेष न्यायालयाने आरोपींविरुद्ध आरोप निश्चित केले होते. आरोपींविरुद्ध भादंवि 302 (खून), 120 ब (कट रचणे), बेकायदा शस्त्र बाळगणे, तसेच बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यान्वये (यूएपीए) आरोप निश्चित करण्यात आले.

सुरुवातीला या खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात झाली. नावंदर यांची बदली झाल्यानंतर विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सीबीआयचे वकील अ‍ॅड. प्रकाश सूर्यवंशी यांनी या खटल्यात 20 साक्षीदारांची साक्ष नोंदविली. बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. प्रकाश साळसिंगीकर, अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर, अ‍ॅड. सुवर्णा आव्हाड यांनी दोन साक्षीदारांची साक्ष नोंदवली.

नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाचा घटनाक्रम

-20 ऑगस्ट 2013 : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून

-पुणे पोलिसांकडून चौकशीला सुरुवात

-मे 2014 : पुणे पोलिसांकडून सीबीआयकडे तपासाची सूत्रे

-जून 2016 : सीबीआयकडून दोन वर्षांनी पहिला आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडेला पनवेलमधून अटक केली.

-सप्टेंबर 2016 : डॉ. वीरेंद्रसिंह तावडेवर हत्या आणि हत्येचं षडयंत्र रचल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल.

-ऑगस्ट 2018 : महाराष्ट्र एटीएसकडून वैभव राऊत आणि शरद कळसकर याला अटक.

-मे 2019 : व्यवसायाने वकील असलेले संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेला सीबीआयकडून अटक, पुनाळेकर आणि विक्रम भावेची न्यायालयाकडून जामिनावर सुटका.

-सप्टेंबर 2019 : दाभोलकर हत्याप्रकरणात आरोपी म्हणून दाखविलेल्या सनातन संस्थेशी संबंधित सारंग आकोलकर आणि विनय पवार यांची नावे दोषारोपपत्रातून वगळली.

-सप्टेंबर 2021 : पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने दाभोलकर हत्याप्रकरणी अटक केलेले डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद काळस्कर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्याविरोधात दोषारोप निश्चित केले.

-आठ वर्षांनी 2021 मध्ये सीबीआयने अटक केलेल्या आरोपीविरोधात खटला सुरू

-10 मे 2024 सुमारे 11 वर्षांनी डॉ. दाभोलकर खटल्याचा निकाल लागला आहे.

हेही वाचा :

३ फूट उंचीचा बिग बॉस फेम अब्दू रोझिक अडकणार लग्नबंधनात

पाकिस्तानला सन्मान द्या, अन्यथा बॉम्ब फोडतील; कॉंग्रेस नेत्याच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

जेल किंवा पक्ष बदलणं दोनच पर्याय होते; रवींद्र वायकर यांच्या धक्कादायक गौप्यस्फोटाने महायुतीच्या अडचणीत वाढ