मोठी बातमी! मुकेश अंबानींनी घेतली राहुल गांधी यांची भेट, भेटीमागचं कारण काय?

आज सकाळपासून अवघ्या देशाचे लक्ष भारतात आगमन झालेल्या(news) विश्वविजेत्या टीम इंडियाकडे लागले आहे. काल संध्याकाळी बार्बाडोसवरुन विशेष विमानाने निघालेला भारतीय संघ शुक्रवारी सकाळी दिल्लीत पोहोचला. यानंतर भारतीय संघाने दिल्लीतील 7 लोककल्याण मार्ग येथे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ही भेट आटोपून भारतीय संघ आता मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे. आता मुंबईत ओपन डेक बसमधून टीम इंडियाची विजययात्रा काढण्यात येणार आहे. त्यामुळे आज सकाळपासून ते इथून पुढचे काही तास तमाम देशवासियांचे लक्ष टीम इंडियावर खिळून असेल.

मात्र, या सगळ्यात दिल्लीत घडलेली एक घडामोड(news) अनेकांच्या लक्षात आली नाही. एरवी अंबानी परिवार हा सामान्य जनता आणि प्रसारमाध्यमांसाठी नेहमीच कुतूहलाचा विषय ठरतो. मात्र, शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे दिल्लीत आले होते तरी बराचकाळ कोणाला त्याचा पत्ता नव्हता. मुकेश अंबानी यांनी दिल्लीत येऊन काँग्रेस पक्षाच्या संसदीय मंडळाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली.

सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील 10 जनपथ या निवासस्थानी मुकेश अंबानी आले होते. यावेळी संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधीही त्याठिकाणी उपस्थित असल्याचे कळते. मात्र, दिल्लीत टीम इंडियाचा कौतुक सोहळा आणि त्यानंतर भारतीय संघाची पंतप्रधान मोदींसोबतची भेट या सर्व गदारोळात मुकेश अंबानी दिल्लीत असल्याची माहिती बराचवेळ समोर आली नव्हती.

अखेर काहीवेळापूर्वी मुकेश अंबानी यांची गाडी सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील 10 जनपथ निवासस्थानावरुन बाहेर पडताना दिसल्यानंतर सगळ्यांना या भेटीबद्दल कळाले. मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याचे येत्या 12 जुलैला लग्न आहे. याच विवाहसोहळ्याचे सोनिया गांधी यांना निमंत्रण देण्यासाठी मुकेश अंबानी दिल्लीत आले होते. मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी या आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या संघाचे मालक आहेत. रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह हे मुंबई इंडियन्सच्या संघातून खेळतात.

हेही वाचा :

ठाकरे गटाच्या माजी नगराध्यक्षावर चाकूहल्ला…

कोटीच्या दागिन्यांची चोरी टीप दिल्यानेच “सॅक” लंपास

वर्ल्डकपची वरात; टीम इंडियाच्या घरात… ढोलताशांचा आवाज ऐकताच रोहित, सूर्यानं ‘असा’ धरला ठेका