दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सर्वात महत्वाची अपडेट समोर आली आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी भारतीय (news) जनता पक्षाचे नेते, आमदार नितेश राणे यांची चौकशी होणार आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी नितेश राणे यांना newsचौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपुतची एक्स मॅनेजर(news) दिशा सालियनचे मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांनी भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार नितेश राणे यांना नोटीस बजावली असून याप्रकरणात त्यांचीही चौकशी होणार आहे.
आमदार नितेश राणे यांनी दिशा सालियन हिच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणात चौकशीची मागणी केली होती. दिशा सालियन हिची आत्महत्या नसून हत्या आहे, असा दावा राणे यांनी केला होता. याची संपूर्ण चौकशी करावी, अशी मागणी नागपूर अधिवेशनात केली होती.
यानंतर सालियन हत्येप्रकरणी आपल्याकडे पुरावे असल्याचाही नितेश राणे यांचा दावा होता. त्यामुळे आता मुंबई पोलिसांकडून नितेश राणे यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या चौकशीत आता नितेश राणे नेमका काय जबाब देतात किंवा आदित्य ठाकरे यांच्याविरोधात कोणते पुरावे सादर करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात मुंबई पोलीस आयुक्तांनी दिशा सालियान आत्महत्या प्रकरणी फेरतपासाचे आदेश दिले होते. अप्पर पोलिस आयुक्त उत्तर विभाग राजीव जैन हे एसआयटीचे प्रमुख आहेत. या एसआयटी पथकात क्राईम ब्रांच आणि इतर युनिट्सच्या तज्ञ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे.
मुंबईतील टॅलेंट मॅनेजर दिशा सालियन हिचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला होता. 8 जूनच्या मध्यरात्री मुंबईतील मालाड येथील गॅलेक्सी रीजेंट इमारतीच्या 14व्या मजल्यावरून 28 वर्षीय दिशा पडली होती. या घटनेच्या दोन दिवसांनी म्हणजेच 11 जून रोजी दिशाच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. शवविच्छेदन करण्यास दोन दिवसांचा विलंब का झाला? असे प्रश्न उपस्थित केले जात होते. दिशाच्या मृत्यूबद्दल काही प्रश्न उपस्थित झाले होते. दिशाच्या आत्महत्येच्या काही दिवसांनी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानेदेखील आत्महत्या केली होती. या दोन्ही आत्महत्या संशयास्पद असल्याचे सांगत तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने ठाकरे सरकारवर अनेक गंभीर आरोप केले होते.
हेही वाचा :
आलिया भट्ट पहिल्यांदाच दिसणार अनोख्या अवतरात
हार्दिक नताशाच्या घटस्फोटाच्या बातम्यांवर पूर्णविराम! पांड्या या रशियन मॉडेलला करतोय डेट
महासत्ता चौकात दुचाकी-कार अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू