हैदराबादच्या संध्या थिएटरमधील(Theatre) चेंगराचेंगरी प्रकरणी सुपरस्टार अल्लू अर्जुनला मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात नामपल्ली कोर्टाने अभिनेता अल्लू अर्जुनला नियमित जामीन मंजूर केला आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेसंदर्भात अभिनेत्यावर आरोप करण्यात आले होते. आता त्याला जामीन मंजूर झाला आहे.

संध्या थिएटर(Theatre) चेंगराचेंगरी प्रकरणी आज नामपल्ली कोर्टात सुनावणी झाली. ज्यामध्ये न्यायालयाने अल्लू अर्जुनच्या बाजूने निर्णय दिला आहे. त्यासोबतच अभिनेता अल्लू अर्जुनला नियमित जामीन मंजूर झाला आहे. न्यायालयाने अल्लू अर्जुनला जामीन अटींचा भाग म्हणून प्रत्येकी 50,000 रुपयांचे दोन जामीन सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
‘पुष्पा 2’ हा चित्रपटाचा प्रीमियर शो हा 4 डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये पार पडला होता. हा शो संध्या थिएटरमध्ये पार पडला होता. यावेळी अल्लू अर्जुनच्या चित्रपटाचा फर्स्ट डे फस्ट शो पाहण्यासाठी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी काही लोक नाचत होते तर काही ढोल वाजवत होते. अनेकजण फटाके फोडतानाही दिसले. दरम्यान, अल्लू अर्जुन स्क्रीनिंगला येणार असल्याचे ऐकून चाहत्यांनी येथे गर्दी केली होती. यावेळी येथे गोंधळ झाला आणि चेंगराचेंगरी झाली. ज्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला.
हेही वाचा :
जितेंद्र आव्हाडांच्या घरी गुप्तचर विभागाचे पोलीस; घरात घुसून शूटिंग
मराठीला अभिजात भाषा दर्जा! एकनाथ शिंदेंच्या वक्तव्याने म्हाडा अधिकाऱ्यांची फजिती
चीनमध्ये नव्या व्हायरसचं थैमान, हॉस्पिटल्स फुल्ल; 5 वर्षांनंतर भयावह स्थिती