आगामी विधानसभा निवडणुक(political news) काही दिवसांवर आली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. अशातच आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एक मोठा धक्का बसला आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ओबीसी सेलचे प्रदेश समन्वयक आणि प्रदेश सरचिटणीस ईश्वर बाळबुद्धे यांनी त्यांच्या पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांकडे परतण्याचा निर्णय घेतला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या(political news) अनुषंगाने ईश्वर बाळबुद्धे यांची घरवापसी होणार आहे. ईश्वर बाळबुद्धे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेल्या काही दिवसांपूर्वीच राम-राम ठोकला आहे. अशातच आता ईश्वर बाळबुद्धे उद्या पुन्हा एकदा स्वगृही परतणार आहेत. यावेळी ईश्वर बाळबुद्धे यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होणार आहे.
याशिवाय या पक्ष प्रवेशाच्या वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माजी मंत्री अनिल देशमुख हे देखील उपस्थित राहणार आहेत. उद्या सकाळी म्हणजेच 20 सप्टेंबरला 11 वाजता हा प्रवेश पार पडणार आहे. ईश्वर बाळबुद्धे यांनी अनेक वर्ष ओबीसी चळवळीत काम देखील केले आहे. मात्र अशातच आता त्यांच्या या निर्णयामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला धक्का बसला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडलेली असताना देखील ईश्वर बाळबुद्धे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष होते. ईश्वर बाळबुद्धे यांनी राज्यभरात यात्रा देखील काढली होती. मागील विधानसभा निवडणुकीत ओबीसी आमदारांचा राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचा प्रचंड मोठा वाटा होता. ईश्वर बाळबुद्धे यांनी प्रत्येक मतदारसंघात जाऊन प्रचार देखील केला होता.
याशिवाय ओबीसी सेलच्या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबिर नागपूर येथे त्यांच्या नेतृत्वात घेण्यात आलं होतं. तसेच महाविकास आघाडीचे सरकार असताना ओबीसी महामंडळाच्या अध्यक्षपदी बाळबुद्धे यांची नियुक्ती देखील करण्यात आलेली होती. मात्र नियुक्तीचा आदेश सरकार अस्तित्वात असेपर्यंत निघालेला नव्हता. नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय फुट पडली. तेव्हा ईश्वर बाळबुधे यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर आता वर्षभराच्या आत त्यांनी पुन्हा घरवापसी केली आहे.
हेही वाचा:
‘या’ दिवशी थिएटरमध्ये 99 रुपयात पाहता येणार सिनेमा
सळसळणारा उत्साह आणि रस्त्यावर उतरलेला जनसागर
आईवरून शिवीगाळ केली, छतावर लटकलेल्या अवस्थेत सापडलं बॉसचं मुंडकं!