भाजपच्या इच्छुक उमेदवाराने दिली ठाकरे गटाच्या नवरात्रोत्सवाला भेट; राजकीय चर्चांना उधाण

एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारांकडून(celebration box) आरोप प्रत्यारोप सुरू असताना, ठाकरे गटाचे ठाणे लोकसभेचे उमेदवार तथा विद्यमान खासदार राजन विचारे यांच्या चैत्र नवरात्रोत्सवाच्या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी भाजप आमदार संजय केळकर यांनी बुधवारी सायंकाळी आवर्जून हजेरी लावत देवीचे दर्शन घेतले.

यावेळी राजन विचारे यांनी इच्छुक उमेदवार संजय केळकर(celebration box) यांचा सत्कारही केला. या भेटीने राजकीय पक्षातील नेत्यांच्या चांगल्याच भुवया उंचावल्या आहेत. नवमीला अशाप्रकारे केळकर यांनी अचानक भेट दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघावर शिंदेसेना आणि भाजपने दावा केल्याने या जागेचा तिढा वाढला आहे. महायुतीकडून अजूनही उमेदवार जाहीर न करता प्रचाराचा धुरळा उडवला जात आहे. त्यातच इंडिया आघाडीकडून उमेदवार म्हणून राजन विचारे यांचे नाव जाहीर करून त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. याशिवाय भाजपने हा मतदारसंघ खेचण्यासाठी अद्यापही जोर लावलेला आहे.

तर भाजपकडून इच्छुकांच्या यादीत माजी खासदार संजीव नाईक आणि आमदार संजय केळकर यांची नावे आघाडीवर आहेत. तसेच शिंदे सेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या व्हायरल पत्रकाने त्यांचे नाव उमेदवार जवळपास निश्चित झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मात्र भाजप आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात राजन विचारे यांच्या वतीने आयोजित केलेल्या चैत्र नवरात्रोत्सवाच्या नवमीला सायंकाळी हजेरी लावत, देवीचे दर्शन घेत देवीला साकडे घातले. यावेळी आयोजक राजन विचारे यांनी आमदार केळकर यांचं स्वागत करून शाल श्रीफळ देत जाहीर सत्कार केला. एकाच लोकसभेचे परस्पर विरोधक इच्छुक आणि उमेदवारांच्या या भेटीने राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींच्या चांगल्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे ही देवी नेमकी कोणाला पावणार हेच पाहावे लागणार आहे.

हेही वाचा :

2 पाय-या चढल्यावरही लागते भयंकर धाप? होता घामाने ओलेचिंब?

मोदी सरकार भ्रष्टाचाऱ्यांची क्लिनिंग मशीन, शरद पवारांचा घणाघात

अजित पवारांच्या येण्याने शिंदे गटाला फटका; तीन ते चार जागांवर नुकसान