महाराष्ट्रच नाही तर देशभरात निवडणुकीत(politics) घोटाळा केला आहे. भाजपने लोकशाही हायजॅक केली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगासारखी संस्था त्यांच्या ताटाखालची मांजर झाली आहे अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी भाजपवर थेट घणाघात केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
सगळं जग हे सांगतं आहे की ईव्हीएम (politics)घोटाळा आहे. जर निवडणूक आयोग हे म्हणत असेल की ईव्हीएममध्ये घोटाळा नाही तर निवडणूक आयोगात घोटाळा आहे. सगळ्या जगाने ईव्हीएम नाकारलं आहे आणि हे शहाणे आले आहेत का? राजीव कुमार उद्या निवृत्त होतील मग मोदी त्यांना बक्षीस देतील अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, घटनात्मक पदावरचे व्यक्ती यांच्याकडून हवी ती कामं करुन घ्यायची आणि त्यानंतर त्यांना बक्षीस द्यायचं, राज्यपाल करायचं, राजदूत म्हणून कुठे पाठवायचं हेच सुरु आहे. महाराष्ट्रात निवडणूक घोटाळा झाला, हरियाणात झाला आहे. निवडणूक आयोगाने मरकवाडीला येऊन बसलं पाहिजे, मरकवाडीच्या जनतेची मागणी होती की ते स्वखर्चाने बॅलेट पेपरवर निवडणूक घेणार होतं. मग राजीव कुमार यांना तफावत दिसली असती.
निवडणूक यंत्रणा भाजपाने हायजॅक केली आहे, लोकशाही हायजॅक केली आहे. लोकशाहीचं रक्षण करणारे चाचेगिरी करत आहेत. दिल्ली निवडणुकीतही मतदार यादीतला घोटाळा होतो आहे. महाराष्ट्रातही तेच झालं, हरियाणातही तेच झालं असाही आरोप संजय राऊत यांनी म्हटलं आहे. निवडणूक आयोग सरकारच्या ताटाखालचं मांजर झाला आहे अशीही टीका राऊत यांनी केली.
हेही वाचा :
आझाद’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च; अमन आणि राशाची दमदार केमिस्ट्री, एकदा जरूर पाहा! VIDEO
“प्रत्येकाच्या आयुष्यात खड्डा पाहिजे…”, मराठमोळ्या अभिनेत्याने कोल्हापुरी भाषेत रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत मांडलं मत, Video
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी भाजप नेत्यांकडून दबाव वाढला