भाजपा नेत्याचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि खूनाचा आरोप

हरिद्वार मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे एका 14 वर्षीय मुलीवर शारीरिक(party supplies) अत्याचार करत तीची हत्या करण्यात आली आहे. हे अत्याचार भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने केले आहेत असा आरोप पीडित मुलीच्या आईने केला आहे. यामुळे संपूर्ण राज्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

अधिक माहिती अशी की, 14 वर्षीय पीडित मुलीचा मृतदेह रोरकी- हरिद्वार महामार्गावर(party supplies) आढळून आला. यानंतर पिडीत मुलीच्या आईने पोलिसात जाऊन तक्रार केली. पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे, भाजपच्या ओबीसी आयोगाचे सदस्य आदित्यराज सैनी आणि त्यांचे सहकारी अमित सैनी यांच्याविरुद्ध बहादराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदित्यराज यांची पक्षातून हकालपट्टी करून त्यांना पदावरून हटवण्यात आले आहे. उत्तराखंड भाजपचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र भट्ट यांनी यासंदर्भातील पत्र जारी केले आहे. सोमवारी सकाळी हरिद्वार जिल्ह्यातील बहादराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पतंजली योगपीठाजवळ मुलीचा मृतदेह आढळून आला. रविवारी सायंकाळी साडेसात वाजता तिची मुलगी अमितसोबत बाहेरगावी गेली होती आणि त्यानंतर बेपत्ता झाल्याचा आरोप मुलीच्या आईने केला आहे.

रात्री उशिरापर्यंत मुलगी घरी न परतल्याने तिच्या आईने तिला तिच्या मोबाईलवर फोन केला मात्र अमितने फोन उचलला असून ती सोबत असल्याने काळजी करू नका असे सांगितले. त्याने तिला वारंवार फोन करून त्रास न देण्यास सांगितले होते, असे महिलेने सांगितले. असे असतानाही काही वेळाने मुलीच्या आईने फोन केला मात्र मोबाईल बंद असल्याचे आढळून आले.

दुसऱ्या दिवशी सकाळीही मुलगी परतली नाही, तेव्हा अमित त्याच्यासोबत काम करत असल्याने ती महिला आदित्यराजच्या घरी गेली, पण तिला मुलगी सापडली नाही. आपण पोलीस ठाण्यात तक्रार करणार असल्याचे तिने सांगितल्यावर, आपण स्वत: या प्रकरणाची चौकशी करू असे सांगून नंतर तिला थांबवले. आदित्यराज गावप्रमुखाचा पतीही आहे.

लग्नाचे खोटे आश्वासन देऊन अमितने आपल्या मुलीला फसवले आणि गेल्या सहा महिन्यांपासून तिच्यावर बलात्कार करत असल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. अमित आणि आदित्यराज यांनी आपल्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या घटनेने उत्तराखंडमध्ये राजकीय खळबळ उडाली असून काँग्रेसने भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेस प्रदेश प्रवक्त्या गरिमा दसोनी यांनी आरोप केला की, राज्यात कायदा व सुव्यवस्था ढासळली असून, त्यामुळे येथे महिलांवर बलात्कार आणि हत्या झाल्याच्या घटना घडत आहेत.

हेही वाचा :

1 जुलैपासून बदलणार महत्त्वाचे नियम; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम

ब्रेकिंग! चंद्रकांत पाटील यांनी मोठ्ठी कॅडबरी देत घेतली उद्धव ठाकरेंची भेट

विवाहबाह्य संबध ठेवल्याचा आरोप लावत महिलेला जमावाची काठीने मारहाण