राज्यभर विधानसभा(assembly) निवडणुकीची तयारी करण्यात सर्वच राजकीय पक्ष दंग आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी मोठे आव्हाने घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. अशातच आगामी विधानासभेच्या अनुषंगाने भाजपने एक जबरदस्त मेगा प्लॅन तयार केला आहे. भाजपने विधानसभा निवडणुकीची जबाबदारी चार दिग्गज नेत्यांवर सोपवली आहे.
आगामी विधानसभा(assembly) निवडणुकीची तयारी नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि रावसाहेब दानवे या चतुर्भुजांवर सोपवली जाणार आहे. दरम्यान येत्या आठवड्याभरात 20 स्टार प्रचारकांची व्यवस्थापन समिती देखील जाहीर होणार आहे. या निवडणूक व्यवस्थापन समितीचे रावसाहेब दानवे पाटील हे प्रमुख संयोजक असणार असल्याची माहिती मिळाली आहे.
याशिवाय अशोक चव्हाण, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, नारायण राणे, रवींद्र चव्हाण, पंकजा मुंडे, विजया रहाटकर, प्रवीण दरेकर, राधाकृष्ण विखे पाटील, भाई गिरकर, अतुल सावे, संजय कुटे, जयकुमार रावल, रक्षा खडसे, अशोक नेते, मुरलीधर मोहोळ यांचा देखील या समितीत समावेश असणार आहे. तर दुसरीकडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे यंदाच्या निवडणुकीत विशेष प्रचारक म्हणून एक महिना संपूर्ण महाराष्ट्र पालथा घालणार असल्याचे देखील बोलले जात आहे.
अगदी काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी देश आणि राज्य पातळीवर भाजप पक्षाला चांगलाच धक्का दिला आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपची मोठी पिछेहाट झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे नितीन गडकरी महाराष्ट्र दौरा करणार आहेत.
अशातच राज्यातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी भाजपप्रणित महायुतीला अवघ्या 17 जागांवर विजय मिळवता आला आहे. तर महाविकास आघाडीने तब्बल 30 जागांवर विजय मिळवला आहे. या निकालांनी महायुती आणि भाजपचे सर्वच नेते प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करूनच भाजपने येत्या विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी केल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा:
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची मेगा प्लॅनिंग
ऐन गणेशोत्सवात मिरवणुकीत ‘डीजे’वर घालण्यात आली बंदी; तरी डीजे लावला तर…
11 वर्षाच्या मुलीवर मौलानाचा तीन महिन्यांपासून अत्याचार