ऑफिसला जाण्याचा कंटाळा? पुण्यातील ‘हा VIDEO पाहा आणि मिळवा जबरदस्त मोटिव्हेशन!

रविवार संध्याकाळ झाली की दुसऱ्या दिवशी (office)ऑफिसला जायचेय या विचारानंच डोकं भंडावून जातं. आपल्यापैकी अनेक जण असे असतील ज्यांना सोमवारी ऑफिसला जायचा वैताग येतो.

पण हे असं का होतं? कारण आपल्यामध्ये मोटिव्हेशनची कमतरता आहे. घर चालवायला पैसे लागतात म्हणून बहुतांश लोक नोकरी करताहेत. कोणालाही विचारा, ‘जर लाखो रुपयांची लॉटरी लागली तर मी आत्ता नोकरी सोडेन’ असं तो सांगेल. कारण नोकरी हा अनेकांसाठी नाईलाज आहे.

त्यामुळे जर रोज (office)ऑफिसला जायचं मोटिव्हेशन तुमच्याकडे नसेल तर हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहा. आपलं आयुष्य किती सुंदर आहे हे तुमच्या लक्षात येईल. व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

हा व्हिडीओ heypuneofficial या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही एका व्यक्तीला रस्त्याच्या कडेला उभं राहून फळं विकताना पाहू शकता. त्यानं आपल्या गळ्यात कलिंगडाची माळ घातली आहे. डोक्यावर केळीचा घड आहे. कानांवर मोसंबी बांधली आहे. आणि हातामध्ये एक स्पीकर आहे. हा असा अवतार धारण करून तो फळं विकण्याचा प्रयत्न करतोय.

या व्हिडीओच्या माध्यमातून नोकरी करणाऱ्या लोकांचं आयुष्य तुलनेत किती चांगलं आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलाय. कारण दिवसभर हातात फळं घेऊन नाचल्यानंतर तो दोनचारशे रुपये कमावतोय. अशी स्थिती आपली नाहीये. त्यामुळे काम करण्यासाठी यापेक्षा दुसरं मोटिव्हेशन काय पाहिजे?

हा व्हिडीओ १९ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी म्हणतेय, एक पुरूष आपलं घर चालवण्यासाठी वाट्टेल ते करतो. तर कोणी या फळ विक्रेत्याचं कौतुक करतोय. हा व्यक्ती स्वभावाला खूप चांगला असून तो नेहमी ग्राहकांशी प्रेमानं बोलतो आणि उत्तम प्रकारची फळं विकतो.

लोकांनी कमेंट सेक्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा व्यक्ती आळंदी रोडला फळं विकतो. तसंच अनेकांनी फळं विकत घेऊन त्याला आर्थिक मदत करण्याची विनंती देखील केली आहे. असो, तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला? तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया द्या.

हेही वाचा :

राष्ट्रवादीचे खासदार महायुतीत जाणार?, किती खासदार फुटणार?, काय म्हणाले शरद पवार?

फायर है अपुन! नितीश रेड्डीने गुडघ्यांवर तिरुपतीच्या पायऱ्या चढून जिंकली चाहत्यांची मने, VIDEO Viral

स्टेट बँकेची हर घर लखपती योजना बनवेल करोडपती, 593 रुपयांपासून गुंतवणुकीची संधी!