दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार!, वाय बी सेंटरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्षात मोठी राजकीय घडामोड झाली होती. पवार कुटुंबातही(political news) मतभेद निर्माण झाले होते. काही सदस्यांनी एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवल्या, त्यामुळे या संघर्षाला आणखी तीव्रता मिळाली. मात्र, गेल्या काही काळात शरद पवार आणि अजित पवार यांच्यात भेटी झाल्या, तसेच छगन भुजबळ यांनीही शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीतील दोन्ही गटांमधील अंतर काहीसं कमी झाल्याचं बोललं जात आहे.

शरद पवार यांचे स्वीय सहायक तुकाराम धुवाळी यांचे अलीकडेच निधन झाले. ते राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांशी अत्यंत जिव्हाळ्याने जोडले गेले होते. त्यांच्या जाण्याने दोन्ही गटांमधील नेत्यांनी शोक व्यक्त केला. त्यांच्या स्मरणार्थ उद्या वाई. बी. सेंटर येथे संध्याकाळी 4.30 ते 6.30 या वेळेत शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व प्रमुख नेत्यांची उपस्थिती पहिल्यांदाच एका मंचावर दिसणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरणार आहे.

या शोकसभेला शरद पवार(political news) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. यामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे , दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फूटीनंतर पहिल्यांदाच दोन्ही गटातील नेते एका व्यासपीठावर एकत्र येणार असल्याने, हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा क्षण असणार आहे. यामुळे पक्षाच्या भविष्यातील राजकीय समीकरणांबद्दल नवे संकेत मिळण्याची शक्यता आहे.

तुकाराम धुवाळी हे शरद पवारांचे अत्यंत जुने सहकारी आणि विश्वासू स्वीय सहायक होते. शरद पवार गेल्या 60 वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत, तर धुवाळी यांनी 1977 पासून 53 वर्षं त्यांना साथ दिली. अखेरच्या श्वासापर्यंत ते शरद पवारांच्या सोबत राहिले. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे आणि सचोटीमुळे ते पवार कुटुंबातील अत्यंत महत्त्वाचे व्यक्ती बनले होते. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

या शोकसभेत दोन्ही गट एकत्र येणार असल्याने, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील राजकीय वाटचालीबद्दल नवी चर्चा सुरू झाली आहे. हा एकत्रित कार्यक्रम केवळ श्रद्धांजलीपर्यंत मर्यादित राहणार की यामधून काही मोठे राजकीय संकेत मिळतील, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

प्रचंड वेगात लाट आली अन्…! खवळलेल्या सागरात भली-मोठी बोट झाली पलटी Video Viral

सांगलीतील धक्कादायक घटना : रक्ताच्या उलट्या झाल्याने बर्फ गोळा विक्रेत्याचा मृत्यू;

माता न तू वैरिणी! आईने केली १७ वर्षीय दिव्यांग मुलीची हत्या, आजीने लावली मृतदेहाची विल्हेवाट