‘महिनाभरात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस येतील’, शिंदे गटातील मंत्र्याच्या दाव्याने खळबळ!

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत(political news) महाविकास आघाडीचं पानिपत झालं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला लोकसभेतील कामगिरी पुन्हा करता आली नाही. याउलट अजित पवार गटाने विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी केली. एकूणच महायुतीने या निवडणुकीत मुसंडी मारली.

यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस(political news) एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावरच आता शिंदे गटाचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे. महिनाभरात दोन्ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील असा दावा शिरसाट यांनी केला आहे.

शिरसाट पुढे म्हणाले, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेशिवाय राहण्याची सवय नाही. सत्तेसाठी ते सतत उड्या मारत असतात. त्यामुळे आता एकत्र येण्यासाठी दोन्ही गटांचे वाद सुरू झाले आहेत. खरंतर ही प्रक्रिया पक्ष एकत्र येण्याचीच आहे. दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकमेकांवर टीका करताना दिसत नाहीत. म्हणून असे वाटते की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस येत्या महिन्याभरात एकत्र येतील.

आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तीन वेळा भेट घेतली होती. याबद्दल विचारले असता शिरसाट म्हणाले, आदित्य ठाकरे सध्या फडणवीसांच्या प्रेमात पडले आहेत. सरड्याच्या रंगाप्रमाणे बदलणाऱ्या भूमिका आता आम्ही पाहत आहोत. टोमणे मारणाऱ्यांना आता कळले आहे की पाच वर्षे काही होणार नाही. पाण्याविना मासा तडफडतो तसे ते आता तडफडत आहेत अशी टीका मंत्री शिरसाट यांनी केली.

हेही वाचा :

200 रुपयांपेक्षा स्वस्त रिचार्ज प्लॅन्स, 2GB डेटासह अनलिमिटेड कॉलिंग

ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला जिनपिंग यांना आमंत्रण; PM नरेंद्र मोदींना का नाही?

शॉपिंगसाठी तयार आहात ना? या दिवशी सुरू होतोय Flipkart चा Republic Day स्पेशल सेल!