लोकप्रिय अभिनेत्री आणि ‘बिग बॉस’ हिमांशी खुराना सोशल मीडियावर (break up)चांगलीच सक्रिय असते. चाहत्यांसोबत हिमांशी फोटो शेअर करताना दिसते. गेल्या काही दिवसांपासून हिमांशी तिच्या ब्रेकअपच्या चर्चांमुळे चर्चेत होती. तिच्या ब्रेकअपला 8 महिनी झाले आहेत. या सगळ्यात हिमांशी खुरानानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना कंफ्युज केलं आहे.
हिमांशीनं हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून(break up) शेअर केला आहे. या व्हिडीओत हिमांशी ही तिच्या नवरीच्या वेशात दिसत आहे. हिमांशीच्या या पोस्टनं चाहत्यांना हैरान केलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडिावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यासोबत चाहते कमेंट देखील करत आहेत. तर अनेकांनी त्यावर कमेंट करत प्रश्न उपस्थित केले आहेत. अनेकांनी कमेंट करत तर हिमांशीला लग्न केलं का असं विचारताना दिसत आहेत.
हिमांशीनं तिच्या इन्स्टाग्रामवर जो व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओत ती नदीच्या किनाऱ्यावर असल्याचे दिसत आहे. यावेळी हिमांशीनं लाल रंगाचा लग्नाचा ड्रेस परिधान केला असून तिच्या नाकात नथनी आणि डोक्यावर टीळा आहे. याशिवाय तिच्या हातात लाल चूडा देखील आहे. व्हिडीओमध्ये हिमांशी ज्या प्रकारे पोज देत आहे, त्यावरून असं वाटतंय की ती कोणत्या तरी नव्या प्रोजेक्टवर काम करत आहे.
हिमांशीच्या लूकची सगळे स्तुती करत आहे. अनेकांना तिचा हा ब्रायडल लूक आवडला आहे. अनेक चाहत्यांनी कमेंट केली की तिनं लग्न केलं? व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला हिमांशीनं एक डायलॉग देखील अॅड केला आहे. तो डायलॉग असा आहे की ‘वो जहर देता तो पूरी दुनिया की निगाह में आ जाता… तो ये किया कि मुझे वक्त पर दवाई नहीं दी’.
हिमांशीचा हा डायलॉग ऐकल्यानंतर नेटकरी कमेंट करत बोलत आहेत की तिनं हा डायलॉग तिचा एक्स बॉयफ्रेंड आसिम रियाजसाठी आहे. हिमांशी खुराना आणि आसिम रियाजची पहिली भेट ही रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 13’ मध्ये झाली होती. त्या दरम्यान, ते रिलेशनशिपमध्ये आले. दोघं 3 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. ज्यानंतर त्यांनी गेल्या वर्षी 2023 मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. त्या मागचं कारण त्यांच्या धर्म होता.
हेही वाचा :
किसिंग सीन करण्यापूर्वी महेश मांजरेकरांनी 5 वेळा हात धुतले!
‘कावळ्यांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्ला, टोचून टोचून रक्तबंबाळ केलं’
कांबळीला उभंही राहता येईना… धक्कादायक Video नंतर सचिन मित्रासाठी येणार धावून?